ETV Bharat / state

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन शुक्रवारपासून धावणार; या 'चार' कारणांमुळे खास आहे ट्रेन

उद्यापासून मुंबई ते शिर्डी मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. नाशिकचे त्रंबकेश्वर, शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन तसेच सोलापूर येथे सिद्धेश्वर, पंढरपूर या धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम या ट्रेनमुळे होणार आहे.

Vande Bharat Express
Vande Bharat Express
author img

By

Published : Feb 9, 2023, 8:43 PM IST

मुंबई : भारतीय रेल्वेची अर्ध-द्रुतगती ट्रेन असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर या मार्गावर उद्या १० फेब्रुवारीपासून धावणार आहे. या ट्रेनला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे हिरवा कंदील दाखवणार आहेत. या ट्रेनच्या गतीमुळे तसेच धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम या ट्रेनमुळे होणार आहे. यामुळे ही ट्रेन खास आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी दिली.

यामुळे ट्रेन खास आहे : उद्या पासून सुरु होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन आज मीडियाला दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १८ नंबर प्लॅटफॉर्मवर आणण्यात आली. या ट्रेनची माहिती देताना महाव्यवस्थापक नरेश लालवाणी बोलत होते. यावेळी बोलताना, १८५३ मध्ये बोरीबंदर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली ट्रेन चालवण्यात आली आहे. त्यानंतर मुंबईमधून अशी ट्रेन पहिल्यांदा सुरु होत आहे. या मार्गावर दोन घाट आहेत. या घाटांवर ट्रेनला मागून धक्का देण्यासाठी बँकर लावावे लागतात. या ट्रेनला तसे बँकर लावण्याची गरज पडलेली नाही. ती आपल्या गतीमुळे घाट पार करत आहे.

धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम : दोन ट्रेन एकाच दिवशी सुरु होणे हे भारतात कढीही कुठेही झाले नाही. ते मुंबईमध्ये होत आहे. तसेच धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम ही ट्रेन करत आहे. नाशिक मध्ये त्रंबकेश्वर, शिर्डी येथे साईबाबा यांचे दर्शन तसेच सोलापूर येथे सिद्धेश्वर पंढरपूर या धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम या ट्रेनमुळे होणार आहे. सहा तासात ही ट्रेन आपले अंतर पार करणार आहे. १६ डब्बे आहेत. सर्व मिळून ११८८ सीट्स यामध्ये आहेत अशी माहिती महाव्यवस्थापकांनी दिली.

अशी झाली चाचणी : मध्य रेल्वेवर मुंबई पुणे मार्गावर लोणावळा आणि खंडाळा यासारखे मोठे घाट आहेत. या घाटावर मेल एक्सप्रेस गाड्यांना आणखी एक अतिरिक्त इंजिन म्हणजेच बँकर्स लावावे लागते. घाट विभागात बॅंकर्सचा वापर गाड्या ढकलण्यासाठी केला जातो. डबे तुटल्यास ट्रेन मागे जाण्याच्या घटना टाळल्या जातात. परंतु बँकर्सला जोडण्याच्या आणि विलग करण्याच्या प्रक्रियेस किमान काही मिनिटे लागतात. तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रवासाचा वेळ वाढतो. हा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी, रेल्वे अधिकाऱ्यांनी बँकर न जोडता या दोन्ही मार्गांवर सेमी हाय-स्पीड गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकर्स न लावता या ट्रेनची चाचणी यशस्वी झाली आहे अशी, माहितीही महाव्यवस्थापकांनी दिली.

किती तासात प्रवास होणार : वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ६.१५ वाजता रवाना होणार असून, दुपारी १२.१० वाजता शिर्डी येथे पोहोचेल. त्याच दिवशी ही एक्प्रेस शिर्डी येथून सायंकाळी ५.२५ वाजता रवाना होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ११.१८ मिनिटांनी एक्स्प्रेस मुंबईत पोहोचेल. या एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डी अंतर पार करण्याठी ५ तास ३० मिनिटे लागणार आहेत.

साडे सहा तासात सोलापूर : वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ४.१० वाजता रवाना होणार असून, सायंकाळी ७.१० वाजता पुणे येथे पोहोचेल. तर सोलापूरला रात्री १०.४० वाजता पोहचेल. रात्री ही एक्सप्रेस सोलापूर येथे मुक्काम करणार दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०५ वाजता रवाना होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी १२.३५ वाजता पोहचेल. या एक्स्प्रेसला मुंबई ते पुणे हे अंतर पार करण्यासाठी ३ तास तर, मुंबई ते सोलापूर हे अंतर पार करण्यासाठी ६ तास लागणार आहेत.

किती आहे तिकिटाचा दर : वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पुणे येथे जाण्यासाठी चेअर कारसाठी ५६० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११३५ रुपये तिकीट असणार आहे. मुंबई ते नाशिक जाण्यासाठी चेअर कारसाठी ५५० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११५० रुपये तिकीट असणार आहे. मुंबई ते शिर्डी प्रवासासाठी चेअर कारसाठी ८०० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १६३० रुपये तिकीट असणार आहे. तर मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी चेअर कारसाठी ९६५ रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १९७० रुपये तिकीट असणार आहे.

ट्रेनमध्ये काय खायला मिळणार : वंदे भारत एक्सप्रेस ही सकाळची ट्रेन असल्याने नाश्तामध्ये बेसन पोळी, ज्वारीची भाकरी, चिवडा, शेंगदाणा हे पदार्थ दिले जाणार आहेत. जेवणाच्या वेळी शकाहारी प्रवाशांना झुणका नाचणीची भाकरी, शेंगदाणा पुलाव, मटर शेंगदाणा पुलाव तर, मांसाहारी प्रवाशांना चिकण कोल्हापूरी, चिकण तांबडा रस्सा, सावजी चिकण हे पदार्थ दिले जाणार आहेत.

काय आहे वंदे भारत एक्सप्रेस : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आली. भारत सरकारच्या मेक इन इंडिया ह्या उपक्रमाअंतर्गत १८ महिन्यांच्या कालावधीत १०० कोटी रुपये खर्चून ह्या रेल्वेगाडीची संकल्पना, विकास, निर्मिती केली गेली. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी ह्या शहरांदरम्यान धावली. ही ट्रेन ताशी १२० किलोमीटर वेगाने धावते. या गाडीचे सर्व डबे वातानुकूलित आहेत. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिडीओ प्रणाली, स्वयंचलित खिडक्या दरवाजे, अत्याधुनिक सीसीटीव्ही, इमरजन्सी पुश बटन, व्हॅक्युम सुविधा असलेले शौचालये, १८० अंश फिरणारी आसने आदी सुविधा या ट्रेनमध्ये आहे. या ट्रेनच्या धावण्याच्या गतीमुळे हजारो प्रवाशांचा प्रवासामधील वेळ वाचणार आहे.

हेही वाचा - Shashikant Warishe Accidental Case : शशिकांत वारीसे यांच्या मृत्यूप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्ध 302 अन्वये गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.