मुंबई - राज्यात गुरूवारी 48 हजार 006 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. आजपर्यंत 8 लाख 30 हजार 345 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यापैकी 972 जणांना को-वॅक्सिन ही लस देण्यात आली, तर इतरांना कोव्हीशिल्ड ही लस देण्यात आली, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
राज्यात गुरूवारी 841 केंद्रांवर 48 हजार 006 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 40,931 लाभार्थ्यांना पहिला, तर 7075 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 14 हजार 673 आरोग्य आणि 26 हजार 258 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 7075 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 47,034 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीद्वारे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी 40,103 लाभार्थ्यांना पहिला व 6931 लाभार्थ्याना दुसरा डोस देण्यात आला. 972 लाभार्थ्यांना को-वॅक्सिन ही लस देण्यात आली. 434 त्यापैकी 828 लाभार्थ्यांना पहिला, तर 144 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आजपर्यंत 8 लाख 30 हजार 345 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
जिल्हानिहाय आकडेवारी -
अहमदनगर 31463 आरोग्य सेवकांचे लसीकरण करण्यात आले. तर अकोला-11301, अमरावती-19354, औरंगाबाद-21731, बीड-12256, भंडारा-10174, बुलढाणा-14842, चंद्रपूर-18572,
धुळे-11256, गडचिरोली-10549, गोंदिया-9425, हिंगोली-5942, जळगांव-17731, जालना-11870, कोल्हापूर-24556, लातूर-13346, मुंबई-133785, नागपूर-37686, नांदेड-14305, नंदुरबार-11921, नाशिक-36985, उस्मानाबाद-8721, पालघर-22462, परभणी-7146, पुणे-80285, रायगड-12803, रत्नागिरी-11996, सांगली-21587, सातारा-32992, सिंधुदुर्ग-7696, सोलापूर-29024, ठाणे-79577, वर्धा-16457, वाशीम-6636 तर यवतमाळ-13913 कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले असून एकूण 8,30,345 आरोग्य सेवकांचे लसीकरण करण्यात आले.
हेही वाचा - भोकरदन तालुक्यासह शहरात मुसळधार पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान