मुंबई - ‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’मार्फत (आयसीएआय) मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए (चार्टर्ड अकाऊंट्स ) चा अंतिम निकाल आणि त्यासोबतच फाऊंडेशन परीक्षेचाही ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीएच्या नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमांचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात दोन्ही ग्रुपमधून कोटपुटलीचा अजय अग्रवाल देशात पहिला आला आहे. हैदराबादची राधालक्ष्मी व्ही. पी. दुसरी तर ठाण्यातील उमंग गुप्ता देशात तिसरा आला आहे.
आपण या परीक्षेसाठी खूप तयारी केली होती, त्यामुळेच आपल्याला हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया ठाण्यातील उमंग गुप्ता याने दिली. तर, दुसरीकडे देशात ३८ व्या स्थानावर मुंबईतील भक्ती सेठ ही आली आली असून मागील काही वर्षांत मुंबईतून देशभरात चमकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याचे या अंतिम निकालावरून दिसून आले आहे.
‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’ मार्फत यंदा सीएची परीक्षा ही जुना अभ्यासक्रम आणि नवा अभ्यासक्रम अशा दोन विभागात घेण्यात आली होती. जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल ७.६३ टक्के इतका लागला आहे. तर, नव्या अभ्यासक्रमाचा निकाल २०.८५ टक्के इतका लागला आहे. हा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातून जुन्या अभ्यासक्रमातून ११८७ विद्यार्थी तर नव्या अभ्यासक्रमातून २३१३ विद्यार्थी सीए झाले आहेत.
सीएच्या निकालासोबत फाऊंडेशन परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला असून तो १८.५८ टक्के इतका लागला आहे. सीएमध्ये परीक्षेतील नव्या अभ्यासक्रमाची ११०९२ विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती. यापैकी २३१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. यात भोपाळचा नयन गोएल देशात पहिला आला आहे. तर, बंगळुरूची काव्या एस. दुसरी आणि जयपूरचा अर्पित चित्तोरा देशात तिसरा आला आहे. तर, जुन्या अभ्यासक्रमाची १५ हजार ५६० विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती. यापैकी ११८७ विद्यार्थी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत कोटपुटलीचा अजय अग्रवाल देशात पहिला आला आहे. हैदराबादची राधालक्ष्मी व्ही. पी. दुसरी तर ठाण्यातील उमंग गुप्ता तिसरा आला आहे. मुंबईतील भक्ती सेठ ही देशातून ३८ वी आली आहे. यात फाऊंडेशन परीक्षेचा निकाल १८.५८ टक्के इतका लागला आहे. यात पुण्याचा रजत राठी पहिला आला तर श्रीकाकुलमचा कलीवराप्पू साई दुसरा आणि भोपाळची प्रियांशी साबू आणि सुरतची मिनल अग्रवाल या दोघींनी तिसऱ्या स्थानावर नाव कोरले आहे
फाऊंडेशन निकाल
मुले - १७८४४ पैकी ३२९६ उत्तीर्ण
मुली - १३१२७ पैकी २४५७ उत्तीर्ण
सीएचा अंतिम निकाल
बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
ग्रुप १ ग्रुप २ दोन्ही ग्रुप ग्रुप १ ग्रुप २ दोन्ही ग्रुप
जुना २५०५२ ३६९४५ १५५६० ४६१० ८७६२ ११८७
नवा ८८९४ ६५२९ ११०९२ १५०० ११४६ २३१३