मुंबई - शिवाजीपार्कवर होणारा दसरा मेळावा ( Dasara Melawa on Shivaji Park )कोणाचा या प्रश्नांचे उत्तर जरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा असेल तरी आता हा मेळावा भव्यदिव्य करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिवसेना अर्थात पेंग्विन सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मदत घेत आहे. असा आरोप भाजप प्रवक्ते, आमदार राम कदम यांनी केला ( Ram Kadam criticize Shiv Sena ) आहे. मुंबईत ते बोलत होते.
काय म्हणाले राम कदम - याप्रसंगी बोलताना राम कदम म्हणाले की, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान भरावे म्हणून आता पेंग्विन सेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे मैदान भरायला मदत करणार आहेत. असे सांगत हे खरे आहे का ? असा प्रश्नही कदम यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर जनाधार असलेले जवळपास सर्वच आमदार, खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. जगाच्या इतिहासात कधी आपण हे पहिले आहे का, की सरकारमध्ये असताना जवळपास ९ कॅबिनेट मंत्री यांना सोडून जातात. या सरकारचा (उद्धव ठाकरे) वसुली वसुली कार्यक्रम होता.
राम कदम यांचे आरोप - बदल्यांनमधून कोट्यवधी रुपये कमवायचे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा पडलेला विसर त्यामुळे हे सर्व घडले आहे, असे सांगत मंत्रालयात अडीच वर्षात कधीच गेले नाहीत, घराबाहेर पडले नाहीत, म्हणून आता शिवाजीपार्क भरण्यासाठी यांना आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मदत घ्यावी लागत आहे. नेमकी काय वस्तुस्थिती आहे याची माहिती पेंग्विन सेनेने द्यावी अशी मागणी राम कदम यांनी ( Ram Kadam accuses Uddhav Thackeray ) केली आहे.