ETV Bharat / state

आदित्यला शिवसेनेवर लादला नाही - उध्दव ठाकरे यांचे स्पष्टीकरण - मनसे

ठाकरे घराण्यातून आदित्य हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, पण त्याच्यासाठी मी कोणत्याही विरोधकाकडे जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 2, 2019, 10:58 PM IST

Updated : Oct 2, 2019, 11:18 PM IST

मुंबई - ठाकरे घराण्यातून आदित्य हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे, पण त्याच्यासाठी मी कोणत्याही विरोधकाकडे जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले तो माझ्यापेक्षा जास्त काम करतो, मी आदित्यला शिवसेनेवर लादणार नाही.

बोलताना उद्धव ठाकरे

आदित्य मनापासून काम करतोय याचा मला आनंद आहे. लोकांची सेवा करण्याची ठाकरे कुटुंबाची परंपरा त्याने पुढे सुरू ठेवली आहे. दिवंगत बाळासाहेबांनी मला शिवसेनेवर लादला नाही तसा मी ही आदित्यला शिवसेनेवर लादणार नाही, असे उद्धव म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासासाठी आदित्य राजकारणात उतरला आहे. त्याप्रमाणे तरुणांनी पुढे यावे आणि राजकारण हातात घ्यावे. माझी पिढी राजकारण बघत पुढे आली त्याप्रमाणे तरुणांनी पुढे येऊन महाराष्ट्र आणि देश घडवला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मला जे काही बोलायचे आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलेन असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले.

Intro:मुंबई - ठाकरे घराण्यातून आदित्य हा पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे,पण त्याच्यासाठी मी कोणत्याही विरोधकाकडे जाणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी आदित्यच्या बिनविरोध निवडणुकीबाबत आपलं मत स्पष्ट केलं. निवडणूक आली त्यावेळी अनेक विरोधक आमच्याकडे आले मात्र आम्ही कुणाला विरोध करण्याची वृत्ती ठेवली नसल्याचे देखील ते म्हणाले.
Body:आदित्य मनापासून काम करतोय याचा मला आनंद आहे. लोकांची सेवा करण्याची ठाकरे कुटुंबाची परंपरा त्याने पुढे सुरू ठेवली आहे. बाळासाहेबांनी मला शिवसेनेवर लादला नाही तसा मी ही आदित्यला शिवसेनेवर लादणार नाही असं उद्धव म्हणाले. 'महाराष्ट्राच्या विकासासाठी आदित्य राजकारणात उतरला आहे.त्याप्रमाणे तरुणांनी पुढे यावे आणि राजकारण हातात घ्यावे.माझी पिढी राजकारण बघत पुढे आली त्याप्रमाणे तरुणांनी पुढे येऊन महाराष्ट्र आणि देश घडवला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मला जे काही बोलायचं आहे ते मी दसरा मेळाव्यात बोलेन असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा जेव्हा राजकारणात प्रवेश झाला त्यावेळी शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जेव्हा विधान परिषदेवर निवडून गेले त्यावेळी ही शिवसेने आपला उमेदवार दिला नव्हता. तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना देखील बाळासाहेब ठाकरे यांनी पाठींबा दिला होता. याबद्दल पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी 'मी काय केलं हे कोणाला सांगणार नाही,मात्र विरोधी पक्षाने आपला निर्णय घ्यावा' असे त्यांनी सांगितले.
Conclusion:
Last Updated : Oct 2, 2019, 11:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.