ETV Bharat / state

Uddhav Thackeray : त्यावेळी दाऊद भाजपाध्यक्ष होता का? ललित पाटील प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर निशाना

Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी ललित पाटीलवर भाष्य केलं. (Uddhav Thackeray) ललित पाटील हा शिवसेनेचा पदाधिकारी होता, (Lalit Patil case) असा आरोप भाजपानं केला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे म्हणजे बॉम्बस्फोटावेळी दाऊद भाजपाध्यक्ष असल्यासारखं आहे. (Dawood Ibrahim)

Uddhav Thackeray Criticizes BJP
ललित पाटीलवरून उद्धव ठाकरेंची टीका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 7:24 PM IST

Updated : Oct 21, 2023, 7:33 PM IST

मुंबई : Uddhav Thackeray : एकीकडे राज्यात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप व खडाजंगी होत आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरे गटाला धक्का दिला असताना, शनिवारी ठाकरे गटाने भाजपाला मोठा धक्का दिलाय. ठाणे, दिवा या विभागातील ३०० भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. भाजपा नेते रोहिदास मुंडे यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळं हा भाजपाला मोठा धक्का मानला जातोय.

Uddhav Thackeray Criticizes BJP
भाजपा कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

कंत्राटी भरतीवर भाष्य : मला जे बोलायचं आहे ते मी दसरा मेळाव्यात बोलेल. दसऱ्याला भेटू आपण. दसऱ्याला मी आपली वाट बघतो. तसेच पोलीस कंत्राटी भरतीचा निर्णय हा 'मविआ' सरकारचा होता, असं गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला आहे. याबाबत सर्वांना सत्य माहिती आहे, यावर आमचे अरविंद सावंत, संजय राऊत व सुषमा अंधारे बोलले आहेत. याबाबत प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे आहेत, माझ्याकडे नाहीत, असे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिलंय.

ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी : ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याचा टिझरचा व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 'एक्स'वरून पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडिओ ४७ सेंकदाचा असून, यात उद्धव ठाकरे ज्या स्टाईलने भाषणाची सुरुवात करतात, त्या भाषणाची सुरुवात टिझरमध्ये दाखवण्यात आली आहे. "गर्दी तीच..., जल्लोष तोच..., मैदान तेच..., एकनिष्ठ शिवसैनिकांचा दसरा मेळावा. एकच पक्ष, एकच विचार, एकच मैदान", असं टिझरमध्ये दाखवण्यात आलंय. तसेच जमलेल्या माझ्या हिंदू बांधवानो, भगिनीनो आणि मातांनो, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात दाखवण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे शिवसैनिकांचे लक्ष : दसऱ्याच्या मुहुर्तावर दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा याही वर्षी कायम राखली गेली. शिवसेना भवनावर जमत शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. मातोश्री, ठाकरे परिवार आणि दसरा मेळावा यांचे घट्ट नाते आहे. यासाठी मागील वर्षी न्यायालयीन लढा लढावा लागला होता. यंदाच्या शिवसेना मेळाव्याला उद्धव ठाकरे नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय.

हेही वाचा:

  1. Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात संजय राऊत यांचे थेट लागेबांधे; संजय गायकवाडांचा गंभीर आरोप
  2. Ajit Pawar : 'कंत्राटी भरतीनं नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला, आता माफी...', अजित पवारांची टीका
  3. Nitesh Rane : देवेंद्र फडणवीसांना फक्त ट्रेलर दाखवला... ; ड्रग्ज प्रकरणावरुन नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

Last Updated : Oct 21, 2023, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.