मुंबई : मोदींचा नव्हे वृत्तीचा पराभव करणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. जय बजरंग म्हणण्याचे मोदींनी कर्नाटकात आवाहन केले होते. त्यावर ठाकरे म्हणाले. बजरंग तर हनुमान होता, तर तुमच्या सामर्थ्याचे काय? बेळगावात जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्रची घोषणा दिली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
-
#WATCH | "PM has said, "say Jai Bajrang Bali & cast your vote." There was no need to invoke Bajrang Dal or Bajrang Bali in #KarnatakaElections. Public welfare should have been spoken of. So, if the PM tells people to vote by saying "Jai Bajrang Bali", I'd like to tell all… pic.twitter.com/vbf8G6X2Mp
— ANI (@ANI) May 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | "PM has said, "say Jai Bajrang Bali & cast your vote." There was no need to invoke Bajrang Dal or Bajrang Bali in #KarnatakaElections. Public welfare should have been spoken of. So, if the PM tells people to vote by saying "Jai Bajrang Bali", I'd like to tell all… pic.twitter.com/vbf8G6X2Mp
— ANI (@ANI) May 4, 2023#WATCH | "PM has said, "say Jai Bajrang Bali & cast your vote." There was no need to invoke Bajrang Dal or Bajrang Bali in #KarnatakaElections. Public welfare should have been spoken of. So, if the PM tells people to vote by saying "Jai Bajrang Bali", I'd like to tell all… pic.twitter.com/vbf8G6X2Mp
— ANI (@ANI) May 4, 2023
प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पवारांच्या पुस्तकावर बोलण्यासारखे काही नसल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. पवारांच्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, की पवारांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. त्यांच्या पक्षाअंतर्गत चर्चा सुरू आहे. त्यांना आपण काही सल्ला दिलेला नाही. सल्ला पचनी पडला नाही तर काय करणार, असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला? महाविकास आघाडीला तडा जाईल, असे राष्ट्रवादीत काही घडणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उष्णतेच्या लाटेमुळे महाविकास आघाडीच्या सभा स्थगित आहेत. पुढील सभांची घोषणा लवकरच करण्यात येईल असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीमध्ये काहीही बिघाडी नसल्याची ग्वाहीही त्यांनी पत्रकारांना दिली.
राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होताना शरद पवार यांनी प्रकाशित केलेले आत्मचरित्र हे चर्चेचा विषय ठरला आहे. आत्मचरित्रात उद्धव ठाकरे गटाला अडचणी येतील, अशा दोन मुद्द्यांचा उल्लेख आहे. त्यावर उद्धव ठाकरे सडेतोड उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली होती. यावर मात्र ठाकरे यांनी जास्त काही भूमिका घेतली नाही. प्रत्यक्ष पुस्तक वाचल्यावर ते काही प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामध्ये चांगले प्रकल्प येत नाहीत याची खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली. याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की गुजरातला चांगले प्रकल्प जात आहेत. मात्र महाराष्ट्रात राख निर्माण करणारे प्रकल्प येऊ घातले आहेत. असे का होत आहे हे पाहिले पाहिजे असेही ठाकरे म्हणाले. राज्याच्या विकासाकरता मोठ्या आणि चांगल्या प्रकल्पांची गरज आहे. तसेच या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्याही मिळाल्या पाहिजेत. मात्र कोणताही विकास करताना स्थानिकांना विचारात घेणे गरजेचे असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याच्या मुद्द्यावर ठाम - शरद पवार यांच्या लोक माझा सांगाती या पुस्तकातून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीप्पणी करण्यात आली आहे. यावरही उद्धव ठाकरे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. आत्मचरित्र लिहिण्याचा आणि बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मुख्यमंत्री म्हणून मी काय केले हे सगळ्यांना माहित आहे. राज्यातील जनतेला आजही मी कुटुंब प्रमुख वाटतो. त्यामुळे यावर अधिक काही मला बोलायचे नाही. परंतु माझ्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला तडा जाईल असं कोणतेही विधान मी करणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही नेत्याचा विचार नाही, अशी भूमिका पुस्तकातून मांडण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी यावरही प्रतिक्रिया देताना, मी माझ्या मतांवर आजही ठाम आहे आणि भविष्यात त्यावर बोलत राहील असे ठाकरेंनी ठणकावले.
सीमा भागातील नागरिकांनी भाजप विरोधी मतदान करा - दिवंगत नेते शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग दलाच्या मुद्द्यावरून हनुमानाचे नाव घ्या आणि मतदान करा, अशी आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यामुळे कारवाई झाली नाही. आता कारवाईच्या नियमांत बदल झाले आहेत का, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. सीमा भागातील नागरिकांवर कोणतेही सरकार आले, तरी मराठी भाषिकांवर अन्याय होतो. त्यामुळे सीमा भागातील मराठी भाषेत आणि आपली एकजूट तोडू देऊ नका मराठी एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी 'जय भवानी', 'जय शिवाजी' चे नारे देऊन भाजप विरोधी मतदान करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
मोदी प्रवृत्तीचा पराभव करणार - लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ठाकरेंना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर, मी मोदींचा किंवा एका व्यक्तीचा पराभव कधीच करायला म्हणत नाही. मी वृत्तीचा पराभव करायला मागतो. त्यामुळे हुकूमशाहीच्या व्यक्तीचा पराभव करण्यासाठी देशातील सर्व पक्षाने नव्हे तर जनतेने एकत्र यायला हवे, अशी माझी आनंद आहे आणि त्यासाठी मी काम करतोय असे ठाकरे म्हणाले.
केवळ सदिच्छा भेट - विधान परिषदेचे सभापती देवेंशचंद्र ठाकूर यांनी ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर बंद दारात चर्चा केली. खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे शिक्षक आमदार कपिल पाटील यावेळी उपस्थित होते. देवशचंद्र ठाकूर यांनी, भेटीचे कारण स्पष्ट केले. ठाकूर म्हणाले की, माझे शिक्षण महाराष्ट्रात झालं. मराठी आणि मुंबई भेटीची माहिती दिली. तसेच, बिहारमध्ये मी पदवीधर संघाचा आमदार असून सर्वांची माझी जुनी ओळख आहे. त्यांना केवळ सदिच्छा भेट देण्यासाठी आलो होतो असे त्यांनी स्पष्ट केले.