मुंबई: मुंबईतील उबेर कंपनीच्या टॅक्सी चालकाने वेळेमध्ये प्रवासी महिलेला विमानतळावर नेले नाही त्यामुळे त्या महिलेचे चेन्नईला जाणारे विमान चुकले आणि त्यामुळे प्रवासी महिलेने दाखल केलेल्या याचिकेमध्ये ग्राहक न्यायालयाने महिलेच्या बाजूने निकाल देत उबेरला 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. उबेर ने उत्तम सेवा प्रवाशांना दिली नाही असे ग्राहक न्यायालयाने फटकारले. उबेर ने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला मात्र उबेर हे सर्विस प्रोव्हायडरच आहे सेवा प्रदाता आहे ॲग्रीगेटर नाही याबाबतचा ऐतिहासिक निकाल ग्राहक न्यायालयाने दिला.
मुंबई महानगरात देश आणि विदेशातील लाखो प्रवासी येतात आणि त्यांना तात्काळ विमानाने जावे लागते अशीच घटना घडली ज्यात कविता शर्मा यांना मुंबई विमानतळावर जायचे होते. त्यांनी उबेर टॅक्सी बुक केली मात्र ती वेळेत पोहोचली नाही त्यामुळे त्यांनी मुंबईच्या ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली. या याचिकेचा निकाल महिलेच्या बाजूने लागला आणि ग्राहक न्यायालयाने उबेरची सेवा उत्तम नाही. प्रवाशांना समजून घेणारी आणि उत्तम दर्जाची नाही यावरुन महिलेला झालेल्या मनस्तापाची दखल घेत उबेरला दंड ठोठावला.
घटना 12 जून 2018 रोजी आहे. तीने ज्या ठिकाणाहून टॅक्सी बुक केली तिथून मुंबईची विमानतळाचे अंतर 36 किलोमीटर होते आणि त्यासाठी दोन तास अवधी पुरेसा होता.प्रवासी महिलेने तीन वाजून 29 मिनिटांनी म्हणजेच विमान उडण्याच्या साधारणता दोन तासापेक्षा अधिक काळ आधी टॅक्सी बुक केली. मात्र उबेरच्या टॅक्सी चालकाने सीएनजी गॅसच्या ठिकाणी 15 ते 20 मिनिटे वेळ घेतला. त्यामुळे टॅक्सी विमानतळावर पोहोचली नाही आणि यामुळे त्या त्या महिलेचे विमान चुकले आणि काढलेले तिकीटही वाया गेले.
टॅक्सी भाडे बिलाची रक्कम 703 रुपये होती, तर बुकिंगच्या वेळी अंदाजे भाडे 563 रुपये होते. तक्रारदाराने आरोप केला आहे की ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे आणि अव्यावसायिक वर्तनामुळे तिची फ्लाइट चुकली. ट्विटरवर तक्रार केल्यानंतर, उबरने मागितलेले आणि वास्तविक भाड्यातील फरक, 139 रुपये परत केले. उबेरला कायदेशीर नोटीस देऊनही त्यांनी नाही असे उत्तर दिल्यानंतर तक्रारदार महिलेने ठाणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार केली.
उबेरच्या वतीने असा दावा केला गेला होता की, जर उबेर च्या टॅक्सीच्या ड्रायव्हरमुळे ही चूक झाली. आम्ही एग्रीकेटर आहोत सर्विस प्रोव्हायडर नाही. तर ड्रायव्हरच्या चुकीसाठी उबेरला जबाबदार धरता येणार नाही. मात्र ग्राहक न्यायालयाने त्यांचे म्हणणे नियमाचे उल्लंघन असल्याने त्याना प्रवाशांना उत्तम सेवा देण्यात अपयशी ठरल्यामुळे दंड ठोठावला. तसेच प्रवासी महिलेने ड्रायव्हरला भाडे नाही दिलेले उबेर या कंपनीच्या गाडीच्या चालकाला भाडे दिले असल्याचे ग्राहक न्यायालयाने अधोरेखित केले.
यासंदर्भात ग्राहक न्यायालयातील तज्ञ जाणकार शिरीष देशपांडे यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी नमूद केलं की उबेर कडून महिला प्रवाशाला ज्या उच्च गुणवत्तेची सेवा दिली पाहिजे ती दिली गेलेली नाही कोणताही प्रवासी इंटरनेटवरून किंवा मोबाईल ॲपवरून ज्या वेळेला सेवा वापरतो त्या वेळेला त्या कंपनीसोबतचा तो करार असतो त्यामुळे त्या ड्रायव्हरची त्या प्रवाशाचा काहीही संबंध नसतो प्रवासी उबेर या कंपनीसोबत करार करून टॅक्सी बुकिंग करतो आणि त्यामुळे प्रवाशाचा सेवा देण्याचा भाग उबेर कडेच असतो. उबेर ने युरोपात देखील या रीतीने प्रवाशांना फसवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेथील न्यायालय यांनी मात्र उबेरला दणका दिला आणि तेथे देखील दंड थोठवला आहे त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल न्यायसंगत अत्यंत उचित असा आहे आणि प्रवाशांना दिलासा देणारा" असल्याचही त्यांनी नमूद केले आहे.