मुंबई : कालपासून मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊसाची सुरवात झाली आहे. काल मुंबईत पावसाने हजेरी लावत नागरिकांना काहिसा दिलासा दिला होता. मात्र, अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. यासोबतच अनेक भागात इमारत कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. यामध्ये विलेपार्ले पश्चिम येथील नानावटी रुग्णालयाला लागून असलेली दुमजली इमारत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला झाला आहे, तर, तीन जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कपूर रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे.
इमारत कोसळून दोघांचा मृत्यू : दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात आहे. पावसाच्या दुसऱ्याच दिवशी विले पोर्ले येथे इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यात नानावटी रुग्णलयाजवळील इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर घटनास्थाळावर मुंबई पोलीस, अग्निशामन दलाने तीघांना ढिगाऱ्याखालुन बाहेर काढले आहे. यात प्रिशिला मिसाईटा तसेच रोबी मिसाईटा यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे विद्याविहारमध्येही इमारत कोसळली असून तीन जणांना वाचवण्यात यश आले.
पाच जणांना बाहेर काढण्यात यश : या पावसामुळे मुंबईत धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. मुंबईतील विद्या विहारमध्ये इमारत कोसळल्याची घटना नुकतीच घडली असून, आता विलेपार्ले पश्चिम येथील नानावटी रुग्णालयाची दुमजली इमारत कोसळली आहे. ही घटना दुपारी अडीचच्या सुमारास घडली असून इमारतीच्या ढिगाऱ्यातून पाच जणांना बाहेर काढण्यात आले. या पाच जणांवर मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - Panchkula Viral Video: नदीत कारसह वाहून जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी वाचविले, अंगावर शहारे आणणारी घटना पहा