मुंबई - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध हत्यार विक्री करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून आठ देशी पिस्तूल व आठ जिवंत काडतूस हस्तगत केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशच्या खरगौन जिल्ह्यातील काही तस्कर बनावट पिस्तूल व काडतूस विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी घाटकोपर येथे सापळा रचला. त्यावेळी यासीन खान व अझर खान सापळ्यात अडकले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर मध्यप्रदेश येथून त्यांनी पिस्तूल आणल्याची कबूली दिली, अशी माहिती गुन्हे शाखेच पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.