ETV Bharat / state

Dowry Cases Increased : मुंबईत हुंड्यासाठी महिलांना छळण्याचे प्रकार वाढले; दहा महिन्यात ७५२ गुन्ह्यांची नोंद - Torture of women for dowry rise in Mumbai

महाराष्ट्रात २६ नोव्हेंबर हा दिवस हुंडाविरोधी दिन (26th November Anti dowry day) म्हणून पाळण्यात येतो; परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, ग्रामीण भागातच नाही तर मुंबईसारख्या शहरातसुद्धा या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले (dowry crimes increase in Mumbai) आहे. Latest news from Mumbai, Mumbai Crime

Dowry Cases Increased
हुंड्यासाठी महिलांना छळण्याचे प्रकार वाढले
author img

By

Published : Nov 26, 2022, 5:02 PM IST

मुंबई : महाराष्ट्रात २६ नोव्हेंबर हा दिवस हुंडाविरोधी दिन (26th November Anti dowry day) म्हणून पाळण्यात येतो; परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, ग्रामीण भागातच नाही तर मुंबईसारख्या शहरातसुद्धा या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले (dowry crimes increase in Mumbai) आहे. Latest news from Mumbai, Mumbai Crime मुंबईत जानेवारी ते ऑकटोबर या महिन्यात हुंड्यासंबंधी ७५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

हुंड्यासाठी महिलांना त्रास : २६ नोव्हेंबर हा हुंडाविरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो. वेगवेगळ्या संस्था या दिवशी जनजागृती तसेच महिलांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात. ग्रामीण भागात हुंड्याचे आणि त्यामुळे होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण अधिक असले तरी मुंबईसारख्या शहरातही हुंड्यासाठी महिलांना तितकाच त्रास दिला जातो. मुंबईत जानेवारी ते ऑक्टोंबर या महिन्यात हुंड्यासंबंधी ७५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शारीरिक - मानसिक छळ, मारहाण, आत्महत्या, हत्या यांचा समावेश आहे.

शासनाचा हलगर्जीपणा : याविषयी बोलताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याच्या सदस्या नंदिनी जाधव यांनी सांगितले आहे की, भारतातील
हुंडा प्रतिबंधक कायदा हा १९६१ साली अस्तित्वात आला असून त्यानुसार हुंडा देणे आणि घेणे गुन्हा आहे. इतक्या वर्षापासून हा कायदा अस्तित्वात असूनही आजही हुंड्यासाठी महिलांचा छळ करण्याच्या घटना घडत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी हवी तशी होताना दिसत नाही. या कायद्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात हुंडा प्रतिबंध अधिकारी यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नसून फक्त कागदोपत्री अशी नेमणूक दिसत आहे. त्याचबरोबर अशा केसेस मध्ये कुठेही कारवाई होताना दिसत नाही. हा अतिशय कडक कायदा असून जर अशा केसेसमध्ये लवकरात लवकर कारवाई केली गेली नाही तर ती दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, असेही त्या म्हणाल्या. हुंडाविरोधी दिवसानंतर सतत सात दिवस याबाबत राज्यात जनजागृती करण्याच्या कामाची जबाबदारी शासनाची असते. परंतु त्या पद्धतीने ते होत नाही. तर काही सामाजिक संस्था पुढे येऊन अशा पद्धतीने कार्यक्रम राबवत असतात. एकविसाव्या शतकातही अशा प्रकारचे हुंडाबळी घेतले जातात ही फार दुर्दैवाची गोष्ट असल्याचंही नंदिनी जाधव यांनी सांगितले आहे.

मुंबईत ७५२ गुन्हे : मुंबईतही हुंड्यासाठी महिलांना छळण्याचे प्रकार जास्त आहेत. या वर्षीच्या जानेवारी ते ऑक्टोंबर या १० महिन्यात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात ७५२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये ६ घटनांमध्ये हुंड्यासाठी महिलेचा जीव गेला आहे. हुंड्यासाठी छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याच्या २० गुन्ह्यांची नोंद आहे. तर ७२६ गुन्हे हे हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. मागच्या वर्षी २०२१ साली पूर्ण वर्षात गुन्हांची संख्या ८२६ इतकी होती. यावर्षी १० महिन्यात हा आकडा ७५२ झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.