औरंगाबाद - मराठा आरक्षण याचिका अखेर पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून राज्य सरकारने योग्य बाजू न मंडल्यानेच आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय.
वाचा सविस्तर - मराठा आरक्षणाचा स्थगितीला राज्य सरकार जबाबदार, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
मुंबई - सिने अभिनेत्री कंगना रणौतच्या वांद्रे पाली हिल येथील "मणीकर्णिका" या कार्यालयावर पालिकेने कारवाई केली होती. यानंतर आता कंगनाच्या खार येथील घरामधील अनधिकृत बांधकामाबाबत कोर्टाने दिलेला स्टे उचलण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.
वाचा सविस्तर - कंगनाच्या खार येथील घरावरही चालणार हातोडा; कोर्टातील स्टे हटवण्याचा पालिकेचा प्रयत्न
मुंबई - दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन, राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून अभिनेत्री कंगना रणौतच्या आडून शिवसेनेवर केले जात असलेले राजकीय हल्ले याविषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची वर्षा निवासस्थानी सायंकाळी एक खास बैठक पार पडली.
वाचा सविस्तर - मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकीय खलबते; कंगना संदर्भात सावध भूमिका घेण्याची पवारांची सूचना
नवी दिल्ली - देशात असे कितीतरी लोकं आहेत ज्यांना स्वत:चे घर नाही, राहायला जागा नाही, खायला अन्न नाही. दररोज कितीतरी निराधार लोकं उपाशी झोपतात. अशा या लोकांच्या मदतीसाठी सन २००० मध्ये डॉ. बीएम भारद्वाज यांनी 'अपना घर'ची स्थापना केली.
वाचा सविस्तर - निराधारांसाठी आश्रय असलेले 'अपना घर', दर महिन्याला जवळपास १५० लोकांवर मोफत उपचार
मुंबई - राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणासंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्याचा निकाल दिला. यामुळे राज्यात सुरू असलेल्या अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत.
वाचा सविस्तर - मराठा आरक्षणाच्या निकालामुळे अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबणीवर
बीड - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, मृत्यूदर देखील वाढलेला आहे. याचाच परिणाम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एकाच चितेवर आठ कोरोनाबाधित मृतदेहांचे दहन केले असल्याचा प्रकार समोर आला आहे.
वाचा सविस्तर - धक्कादायक : अंबाजोगाईत एकाच चितेवर आठ कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार
मुंबई - मुंबईबाबत वादग्रस्त विधान करणारी सिने अभिनेत्री कंगना रणौत आज (दि.9 सप्टें) दुपारी मुंबईत आली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विमानाने येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला नियमाप्रमाणे 14 दिवस होम क्वारंटाइन केले जाते. मात्र, कंगनाने आपण मुंबईत जास्त दिवस राहणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तीला होम क्वारंटाइन केले जाणार नसल्याचे मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
वाचा सविस्तर - ...म्हणून कंगनाला मुंबई महापालिका 'होम क्वारंटाइन' करणार नाही
मुंबई - मुंबईत कंगना रणौत हिच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर शरद पवार यांनीही टीका केली. आता ही कारवाई करण्याचीही वेळ नव्हती यामुळे लोकांच्या मनात एक शंका निर्माण होईल, असे विधान करून पवारांनी महापालिकेकडून करण्यात आलेल्या आलेल्या कारवाईवर टीका केली.
वाचा सविस्तर - 'कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करण्याची ही वेळ नव्हती, तिला गांभीर्याने घेण्याची गरज नाही'
पुणे - पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर सेवक राजू मिसाळ यांची निवड झाली. त्यानंतर महानगर पालिकेत विरोधी पक्षनेते मात्र, कक्षात धार्मिक पूजा करत मंत्र तंत्र करून खुर्चीवर विराजमान झाले आहेत. एकीकडे शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा किंवा तंत्र मंत्र करण्यास मज्जाव आहे.
वाचा सविस्तर -पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत मंत्रपठण; राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्याने खुर्चीवर विराजमान होण्यापूर्वी घातली पूजा
मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसाच्या रुग्णवाढीमध्ये पुन्हा एकदा सर्वोच्च संख्या गाठत राज्यात २३ हजार ८१६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
वाचा सविस्तर - राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा नवा उच्चांक; २३ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद