मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात 25 ऑक्टोबरला घट होऊन 889 तर 1 नोव्हेंबरला 809 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. आज 4 नोव्हेंबरला 1141 नवे रुग्ण आढळून आले तर 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 1163 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.6 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
- 15,062 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 1141 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 15 हजार 219 वर पोहचला आहे. तर आज 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 345 वर पोहचला आहे. आज 1163 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 56 हजार 263 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.6 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 30 लाख 47 हजार 584 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - एनसीबीची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर चार कोटींचे हेरॉईन जप्त
एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.49 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 86 हजार 432 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 15 हजार 062 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- रुग्ण, मृत्यू संख्येत घट -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141 रुग्ण आढळून आले आहेत.
28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32 मृत्यूंची नोंद झाली आहे.
- या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 252
ठाणे 163
अहमदनगर - 143
पुणे - 241
हेही वाचा - Diwali 2021 : साईनगरी दिव्यांनी उजळली, पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात