ETV Bharat / state

आज ११ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ, १११ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड

author img

By

Published : Dec 15, 2021, 10:33 PM IST

आज (बुधवार) महामंडळाने ११ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ आणि १११ कर्मचाऱ्यांना निलंबित ( ST Workers Suspended ) करण्यात आले आहे. आतापर्यत दहा हजार निलंबित कर्मचाऱ्यांपैकी २४१ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईच्या धास्तीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी आता कर्तव्यावर हजर होत आहे. आज राज्यभरता संप सोडून २१ हजार ८७३ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे.

st
st

मुंबई - विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या दीड महिन्यापासून ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज (बुधवार) महामंडळाने ११ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ आणि १११ कर्मचाऱ्यांना निलंबित ( ST Workers Suspended ) करण्यात आले आहे. आतापर्यत दहा हजार निलंबित कर्मचाऱ्यांपैकी २४१ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कारवाईच्या धास्तीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी आता कर्तव्यावर हजर होत आहे. आज राज्यभरता संप सोडून २१ हजार ८७३ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे.

६७ हजार ६७५ कर्मचारी संपामध्येच -

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संप दिवसेंदीव चिघळ जात आहे. तब्बल ४५ दिवस होऊन सुद्धा एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. महामंडळाने आतपर्यत राेजंदारीवरील २ हजार ३१ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून १० हजार ३७० कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय २ हजार ५७२ कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. मात्र, निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. १० हजार १८० निलंबित कामगारांना सोमवारपर्यत शेवटची संधी देण्यात आलेली होती. त्यातून फक्त सोमवारी १४९ निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. आज राज्यभरात २१ हजार ८७३ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. ६७ हजार ६७५ कर्मचारी अजूनही प्रत्यक्षात संपात सहभागी असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

आज १११ कर्मचारी निलंबित -

न्यायालयाचे निर्देश असतानाही कामगारांचा संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. गेल्या ४५ दिवसांत एसटी महामंडळाकडून आतापर्यत १० हजार ४८१ कर्मचाऱ्यांनावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर एसटी महामंडळाने आज १११ एसटी कर्मचारी निलंबित केले असून ११ निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना घराचा रस्ता दाखवला आहे. या शिवाय ५२ एसटी कर्मचाऱ्यांना बदल्या केल्या आहेत.

१२८ आगार संपामुळे बंदच -

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यभरातील २५० आगारांपैकी १२२ आगार सुरऊ झाले आहे. तर १२८ आगार संपामुळे अजूनही बंद आहे. राज्यातील औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक आणि अमरावती विभागातून २ हजार ७१८ हजार बस फेऱ्या चालविण्यात आहेत. ज्यामध्ये शिवनेरी, शिवशाही आणि साध्या बसेसचा सामावेश आहे.

हे ही वाचा - Suspension of ST Workers : २३० निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाचा दणका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.