मुंबई - पुलगाव येथील दारूगोळा भांडरात राहणाऱ्या सैनिकाने पत्नीची गोळी घालून हत्या... भारतीय चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० रुपये किमतीच्या जवळपास एक कोटी रुपयांच्या नोटा गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केल्या..नाशिकचे आमदार नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा त्यांच्या याच स्वभावाला मुळे चर्चेत आले आहेत... यासारख्या महत्वाच्या १० बातम्या वाचा एका क्लिकवर..
वर्धा - पुलगाव येथील दारूगोळा भांडरात राहणाऱ्या सैनिकाने पत्नीची गोळी घालून हत्या केली. त्यानंतर स्वतःला सुद्धा गोळी मारून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अजय कुमार सिंग असे सैनिकांचे तर प्रियंका असे मृत पत्नीचे नाव आहे.
वाचा सविस्तर - पुलगावत पत्नीची हत्या करून सैनिकाची आत्महत्या?
हैदराबाद - जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यावर औषध तयार करण्याचे काम सुरु आहे. यादरम्यान भारतातील पहिल्या स्वदेशी कोरोनावरील लसीला भारतीय औषधी महानियंत्रकांनी (डीसीजीआई) परिक्षण करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनावर जगातील सर्वात स्वस्त औषध उत्पादन करणे हेच आमचे लक्ष्य आहे, असे भारत बायोटेकचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला म्हणाले. तसेच देशात पुढच्या एक महिन्यापासून या लसीचा पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरु होईल.
वाचा सविस्तर - जगातील सर्वात स्वस्त कोरोना लसीचे उत्पादन करण्याचे भारत बायोटेकचे लक्ष्य
औरंंगाबाद - भारतीय चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० रुपये किमतीच्या जवळपास एक कोटी रुपयांच्या नोटा गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई बुधवारी मोंढा नाका चौकातील सिंधी कॉलनी येथे असलेल्या हॉटेल ग्लोबल इन येथे करण्यात आली. चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून देण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह चार जणांना अटक केली. प्रियंका सुभाष छाजेड (वय ३०, रा.कामगार कॉलनी, चिकलठाणा), नम्रता योगेश उघडे (वय ४०, रा.जबिंदा इस्टेट, बीड बायपास), मुश्ताक पठाण जमशिद पठाण (वय ५३, रा.टाईम्स कॉलनी, कटकटगेट), हाशीम खान बशीर खान (वय ४४, रा.लक्ष्मण चावडी) अशी त्यांची नावे आहेत.
वाचा सविस्तर - औरंगाबादेमध्ये चलनातून बाद झालेल्या सुमारे १ कोटी रुपयांच्या नोटा जप्त
नाशिक - पदाने आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असले तरी कोणताही लवाजमा घेऊन न मिरवणे, कायम सामान्य माणसाप्रामाणे वागणारा आमदार म्हणून सर्वश्रृत असलेले, नाशिकचे आमदार नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा त्यांच्या याच स्वभावाला मुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या या चर्चेचा विषय आहे त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात केलेला संबळ डान्स.
वाचा सविस्तर -विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा मुलाच्या लग्नात संबळ डान्स...
ठाणे - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, ३० जूनला लॉकडाऊन-४ ची मुदत संपली त्यानंतर मात्र राज्यात ३१ जुलै पर्यंत काही नियम शिथील करत लॉकडाऊन सुरूच ठेववण्यात आला आहे. परंतु, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्हा व शहरी भागात परिस्थितीनुरूप कडेकोट लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आला असून आवश्यकते नुसार पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
वाचा सविस्तर-ठाण्यात आजपासून कडकडीत लॉकडाऊन; राज्यातील 'हे' जिल्हेही अद्याप लॉकचं
सोलापूर - पीक कर्जाचे शासकीय नियमानुसार वितरण न करणाऱ्या बँकांविरुध्द पोलिसांकडे तक्रार केली जाणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक बँकेस पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे, पण बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शासकीय नियमानुसार पीक कर्ज वितरण करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुध्द पोलीस तक्रार करावी, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तक्रार नोंदवण्याची कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पष्ट केलंय.
वाचा सविस्तर-पीक कर्ज द्या..! अन्यथा तक्रार दाखल करु; कर्ज न देणाऱ्या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांची तंबी
भोपाळ- मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील सरकारच्या मंत्री मंडळाचा विस्तार आज सकाळी 11 वाजता होणार आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. भाजपाकडून शपथ घेणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. जवळपास 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये जोतिरादित्य सींदिया यांच्या 4 समर्थकांना मंत्रीपदे मिळणार असल्याची माहिती सींदिया यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे.
वाचा सविस्तर - शिवराज सिंह सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार; सींदिया समर्थकांना संधी मिळण्याची शक्यता
सेंट जॉन्स- वेस्ट इंडीज किक्रेटमधील महान फलंदाज सर एवर्टन वीक्स यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. कॅरेबियन क्षेत्रात क्रीडा संस्कृती रुजवणाऱ्यांपैकी ते एक होते. सर एवर्टन वीक्स यांचा विंडीज क्रिकेट मधील 'थ्री डब्ल्यूज' मध्ये समावेश होता. क्लाइड वालकॉट, फ्रैंक वॉरेल यांच्यासह सर एवर्टन वीक्स यांचा डब्ल्यूज मध्ये समावेश होता.
वाचा सविस्तर - वेस्ट इंडीजचे महान फलंदाज सर एवर्टन वीक्स यांचे 95 व्या वर्षी निधन
अमरावती - शहरापासून जवळच असलेल्या अंतोरा गाव परिसरातील एका नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात वारंवार मोठे पूर येतात. त्यात नाला अरुंद असल्याने तो नेहमीच फुटतो. त्याचप्रमाणे यंदाही हा नाला फुटून पावसाचे पाणी शेतात गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे पेरणी केलेले बियाणे सडले काही वाहून गेले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. नाल्याच्या रुंदीकरनासाठी व खोलीकरनासाठी वारंवार जिल्हाप्रशासनाला व पालकमंत्र्यांना निवेदन देउनही हा प्रश्न निकाली न निघाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर त्याच नाल्याच्या पुरात सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे.
वाचा सविस्तर - तिबार पेरणीचं संकट..! अमरावतीच्या अंतोरा गावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा..
रत्नागिरी - तीवरे धरण दुर्घटनेला आज (गुरुवारी) एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, आजही धरणफुटीग्रस्तांच्या अनेक समस्यांचे निराकरण झालेले नाही. त्यामुळे धरणफुटी ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हा विषय आपण शासन स्तरावर लावून धरू आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले.
वाचा सविस्तर -तीवरे धरण फुटी प्रकरण : धरणग्रस्तांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणार - प्रवीण दरेकर