ETV Bharat / state

मुंबईतील हे 'तीन' जण घेतात नगरसेवक आणि आमदार दोन्हींचे मानधन

नगरसेवक जेव्हा आमदार व खासदार म्हणून निवडून जातात अशावेळी त्यांनी एकाच सभागृहाचे मानधन घेणे अपेक्षित आहे. मात्र, मुंबई महापालिकेतील भाजपचे पराग शाह, समाजवादीचे रईस शेख आणि शिवसेनेचे दिलीप लांडे हे तीन आमदार नगरसेवक आणि आमदार असे दोन्ही मानधन घेत असल्याची बाब उघड झाली आहे.

author img

By

Published : Jul 26, 2021, 9:09 PM IST

Updated : Jul 28, 2021, 10:57 PM IST

Corporator MLA pay case
नगरसेवक आमदार मानधन प्रकरण

मुंबई - मुंबई महापालिकेतील नगरसेवक आमदार खासदार म्हणून निवडून जातात. नगरसेवक जेव्हा आमदार व खासदार म्हणून निवडून जातात अशावेळी त्यांनी एकाच सभागृहाचे मानधन घेणे अपेक्षित आहे. मात्र, मुंबई महापालिकेतील भाजपचे पराग शाह, समाजवादीचे रईस शेख आणि शिवसेनेचे दिलीप लांडे हे तीन आमदार नगरसेवक आणि आमदार असे दोन्ही मानधन घेत असल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.

माहिती देताना आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली

हेही वाचा - पुरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीची सर्व नेते धावले, भाजपकडून मात्र राजकारण सुरूच -नवाब मलिक

तीन आमदारांना नगरसेवकांचे मानधन -

मुंबई महापालिकेतील जे नगरसेवक आमदार आणि खासदार म्हणून निवडून गेले आहेत अशा किती लोकांना पालिकेकडून मानधन दिले जाते, याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिकेच्या चिटणीस विभागाकडून मागवली होती. त्यावर चिटणीस विभागाने अनिल गलगली यांस कळविले की, खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर, आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांना दरमहा 25 हजार रुपये मानधनासाठी आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता 150 रुपये भत्त्यासाठी, अशा केवळ चार सभांकरिता मानधन दिले जाते.

पत्र
पत्र
पत्र
पत्र

हे नगरसेवकांचे मानधन घेत नाहीत -

मुंबई महापालिकेतून आमदार म्हणून निवडून गेलेले शिवसेनेचे रमेश कोरगांवकर व भाजपचे खासदार मनोज कोटक हे आमदार आणि खासदार म्हणून मानधन घेत आहेत. त्यामुळे, ते नगरसेवकांना दिले जाणारे मानधन आणि सभेसाठी दिले जाणारे मानधन घेत नाहीत, असे पालिकेच्या चिटणीस विभागाने कळविले आहे.

राजीनामा घ्यावे -

जेव्हा हे नगरसेवक आमदार आणि खासदार झाले तेव्हा त्या जागेवर निवडणूक घेणे आवश्यक होते. पण कोठल्याही राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही. अशा परिस्थितीत मानधन न घेण्याची सूचना करणे आवश्यक होते, असे अनिल गलगली यांनी म्हटले आहे. दरम्यान याबाबत भाजपचे आमदार पराग शाह यांच्याशी संपर्क साधला असता मला यामधील काही माहिती नसल्याने यावर बोलण्यास नकार दिला. तर, समाजवादीचे रईस शेख व शिवसेनेचे दिलीप लांडे यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

हेही वाचा - राज्यात एक कोटी पूर्ण 'लसवंत', 3.16 कोटी लोकांना मिळाला पहिला डोस

Last Updated : Jul 28, 2021, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.