ETV Bharat / state

Rani Bagh Mumbai : राणीबागेत पेंग्विनच्या तीन पिलांचे झाले बारसे ; पेंग्विनची संख्या १२ वर - Rani Bagh Mumbai number of penguins 12

राणीबागेत पेंग्विनला तीन पिल्ले झाली आहेत. या तीनही पिल्लांचे नामकरण नुकतेच करण्यात आले आहे. राणीबागेत तीन पिल्लांचा जन्म झाल्याने पेंग्विनची संख्या १२ झाली (Three penguin chicks hatched in Rani Bagh Mumbai) आहे.

Rani Bagh Mumbai
राणीबागेत पेंग्विनच्या तीन पिलांचे झाले बारसे
author img

By

Published : Nov 19, 2022, 11:25 AM IST

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे भायखळा येथे राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय आहे. या राणीबागेत पेंग्विनला तीन पिल्ले झाली आहेत. या तीनही पिल्लांचे नामकरण नुकतेच करण्यात आले आहे. राणीबागेत तीन पिल्लांचा जन्म झाल्याने पेंग्विनची संख्या १२ झाली (Three penguin chicks hatched in Rani Bagh Mumbai) आहे. राणीबागेतील पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने ऑनलाईन तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली आहे.

पेंग्विनच्या ३ पिल्लांना जन्म : मुंबई महापालिकेची भायखळा येथे राणीबाग आहे. या राणीबागेत परदेशातून हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले आहेत. या पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. यामुळे राणीबाग आणि पालिका प्रशासनावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर १ मे २०२१ ला म्हणजेच महाराष्ट्र आणि कामगार दिनी एका पिलाला जन्म दिला. त्याचे नाव 'ओरियो' असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर मोल्ड नावाचा नर आणि फ्लिपर नावाच्या मादी पेंग्विनने १८ ऑगस्ट २०२१ रोजी एका नर पिल्लाला जन्म दिला आहे. त्याचे नाव 'ऑस्कर' ठेवण्यात आले आहे. यामुळे आता पेंग्विनची संख्या ९ झाली होती. त्यानंतर पेंग्विनने आणखी ३ पिलांना जन्म दिला आहे. २ एप्रिल २०२२ रोजी एका नर पिल्लाचा जन्म झाला त्याचे नाव फ्लॅश, २६ एप्रिल २०२२ रोजी जन्म झालेल्या नर पिलाचे नाव बिंगो तर ९ ऑगस्ट २०२२ रोजी जन्म झालेल्या मादी पिलाचे नाव अॅलेक्‍सा असे ठेवण्यात आले (Rani Bagh Mumbai number of penguins 12) आहे.

ऑनलाईन तिकिट सुविधा : राणीबाग पाहण्यासाठी पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने ऑनलाईन तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली आहे. तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ न दवडता थेट प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटकांना आनंद घेता यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने घरबसल्या ऑनलाईन तिकिट सुविधा सुरु केली आहे. या प्रणालीचा शुभारंभ आज (शुक्रवारी) शतकोत्तर हीरक महोत्सवाच्या सांगता समारंभात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. ऑनलाईन प्रणालीमुळे राणीच्या बागेत येणारी गर्दी नियंत्रणात तसेच विभागली जाण्यासाठी मदत होणार आहे. क्यू आर कोड सोबत पर्यटकांना किऑस्क मशीनच्या माध्यमातून प्रिंटेड तिकिट घ्यावे लागेल. राणीच्या बागेत चार ठिकाणी हे किऑस्क ठेवण्यात आले आहेत. https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करुन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पर्यटकांना ही तिकिट नोंदणी करता (penguin chicks hatched in Rani Bagh) येईल.

बागेत प्लास्टिक क्रशर मशीन : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे हरित क्षेत्र आहे. येथील प्‍लास्टिकच्‍या कचऱ्याची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी ठराविक ठिकाणी प्लास्टिक बॉटल क्रशर संयंत्र लावण्‍यात येत आहेत. प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे, यादृष्‍टीने हा महत्‍वाचा उपक्रम ठरतो आहे. सदर उपक्रम सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत राबविण्यात येत (number of penguins 12) आहे.

बालदोस्‍तांसाठी पुस्तकांचे प्रकाशन : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे लहान मुलांचे अत्‍यंत आवडीचे ठिकाण ठरले आहे. येथील वन्‍यप्राणी-पक्षी, खेळाची उपकरणे, मोठमोठे वृक्ष, बागा यांचा मुले नेहमीच आनंद घेतात. वाघ, बिबट्या, हत्‍ती, माकडं आदी वन्‍यप्राणी तसेच विविध पक्षी पाहणे, त्‍यांच्‍या विविध हालचाली, लकबी हे मुलांचे प्रमुख आकर्षण ठरते. बागा, झोपाळे येथे देखील विशेष गर्दी होते. या सर्व बालदोस्‍तांसाठी पर्यावरण स्‍नेही केटी बागली आणि मेधा राजाध्‍यक्ष लिखित ‘निघाली प्राण्‍यांची मजेदार वरात’ या मराठी पुस्‍तकाचे व त्याच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन करण्‍यात आले. प्राणिसंग्रहालयातील वन्‍यप्राणी विश्‍वातील काही करामती, गंमती-जमती या कवितांमधून बालमित्रांना वाचावयास (Rani Bagh Mumbai) मिळतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.