मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना 'ब्लॅकफंगस' या आजाराचे रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. काळीबुरशी या आजाराचा धोका आतापर्यंत मोठ्या वयोगटातील रुग्णांना झाल्याचे आढळून आले होते. मात्र, आता हा धोका लहान मुलांमध्येदेखील दिसून येत आहे. ब्लॅकफंगसमुळे मुंबईत तीन मुलांचे डोळे काढण्यात आले आहेत. ही सर्व मुले 4 ते 16 वयोगटातील आहेत.
दोन्ही रुग्ण होते अल्पवयीन -
यासंदर्भात बोलताना, डॉ. जेसल शाह यांनी सांगितले की, 'यावर्षी त्यांच्याकडे दोन ब्लॅकफंगस आजाराचे रुग्ण दाखल झाले. हे दोन्ही रुग्ण अल्पवयीन होते. यातल्या 14 वर्षीय मुलीला मधुमेहाची लागण झाली होती. यातील एक मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या 48 तासांत तिचे डोळे काळसर झाल होते. ब्लॅकफंगस नाक, सायनस, डोळ्यापर्यंत व्यापले होत. त्यामुळे या मुलीचा डोळा काढावा लागला.
मुलीच्या पोटापर्यंत पसरली काळीबुरशी -
यावेळी एका 16 वर्षीय मुलीवरदेखील उपचार करण्यात आले. या मुलीच्या पोटापर्यंत काळीबुरशी पसरली होती. त्यानंतर या मुलीवर उपचार करण्यात आले. तसेच एका खासगी रुग्णालयामध्ये चार आणि सहा वर्षाच्या लहान वयोगटातील रुग्णांना ब्लॅकफंगस झाल्याचे समोर आले होते.
हेही वाचा - भविष्यातही देशाच्या राजकारणात शिवसेनेची घोडदौड सुरू राहील'