मुंबई - वाहनाच्या सायलेन्सरमधील मातीपासून सोने तयार करणाऱ्या टोळीस कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी एका विशिष्ट चारचाकी वाहनाचे सायलेन्सर चोरत असे. त्यातील माती वितळवून प्लॅटिनम तयार करत असे. त्यानंतर ते विकत असे. एका सायलेन्सरमध्ये सुमारे एक किलो माती असते. ज्याची बाजारात किंमत 75 हजार रुपये आहे. मात्र, हे चोर ही माती केवळ 25 ते 30 रुपयांत विकत होते, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी दिली.
याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुश्ताक गुल मोहम्मद शेख, सय्यद हुसेन मोहम्मद शरीफ मणिहार आणि सुजित यादव या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे सर्व कांदिवली आणि मालाड-मालवणी परिसरातील रहिवासी आहेत. ते गॅरेजमध्ये काम करणारे आहेत.
आतापर्यंत 9 सायलेन्सर चोरीच्या घटना आल्या समोर
आतापर्यंत 9 सायलेन्सर चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी दोन गुन्हे कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या टोळीत आणखी काही जण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यांचा तपास सुरू आहे.
हेही वाचा - धक्कादायक: अपार्टमेंटचे काम पाहण्यास गेलेल्या अभिनेत्रीचा इंटीरियर डिझायनरकडून विनयभंग