ETV Bharat / state

Jalrani Boat : जलराणी बोटीत पाकिस्तानी नव्हतेच, तपासात झाला महत्त्वाचा खुलासा - लिओ कोलासो

जलराणी बोट प्रकरणी महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. पालघरपासून 44 सागरी मैलावर सापडलेल्या संशयित जलराणी बोटमध्ये पाकिस्तानी नागरिक नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. ही बोट मीरा भाईंदरची असून बोटीमध्ये 15 खलाशी प्रवास करत होते. त्यापैकी नऊजण छत्तीसगडचे तर चारजण हे झारखंडचे आहेत.

Jalrani Boat
Jalrani Boat
author img

By

Published : Apr 1, 2023, 5:01 PM IST

मुंबई : पालघरपासून 44 सागरी मैलावर सापडलेल्या संशयित जलराणी बोट प्रकरणी महत्त्वाचा खुलासा करण्यात आलेला आहे. मुंबई आणि पालघर किनारपट्टी पासून 44 नॉटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नाही. हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे.

जलराणी बोट बुटी यांच्या मालकीची : त्याचप्रमाणे आज 1 एप्रिलला रायगड किनारपट्टीवर 40 नॉटिकल मैल आतमध्ये तटरक्षक दलाच्या हद्दीत 1 संशयास्पद बोट मिळून आली होती. मात्र, ती बोट ही उत्तन, मीरा भाईंदरची असून तिचे नाव जलराणी असे आहे. या बोटीमध्ये 15 खलाशी प्रवास करत होते. त्यापैकी नऊजण छत्तीसगड, चारजण झारखंडचे आहेत. जलराणी ही बोट उत्तनमधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची असून दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे.

बोटीला किनाऱ्यावर परतण्याचे निर्देश : आज सकाळी या बोटीला पाकिस्तानी नागरिकांना घेऊन जात असल्याच्या संशयावरून तटरक्षक दलाने ताब्यात घेतले होते. मात्र, बोटीतील सर्वच्या सर्व पंधरा खलाशांची आधार कार्ड आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नाही, असे कोलासो यांनी सांगितले. जलराणी बोट ही मासेमारीसाठी गेली आहे. बोट संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटीवरून जलराणी बोटिशी संपर्क साधण्यात आला. बोटीला किनाऱ्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

परत येण्यासाठी लागणार दोन तास : लिओ कोलासो यांनी सांगितले की, बोटीने मासेमारीसाठी सुमारे साडेचार किलोमीटर परिसरात जाळे टाकले होते, त्यामुळे त्यांना परत जाण्यासाठी पाच तास आणि परत येण्यासाठी आणखी किमान दोन तास लागतील. जलराणी बोटीत बोट मालक, त्याचा मुलगा आणि 13 खलाशांसह 15 जण होते. खलाशांमध्ये चार झारखंडचे तर नऊ छत्तीसगडचे रहिवासी आहेत. सर्व खलाशांची ओळखपत्रे आणि बँक खात्याचा तपशील उपलब्ध असल्याने तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेल्या बोटीत पाकिस्तानी खलाशी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - Anil Jaisinghani Bail : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण; बुकी अनिल जयसिंघानीचा जामीन फेटाळला

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.