मुंबई - 'राज्यात पून्हा भाजपचेच सरकार येणार आहे,' असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या बैठकीत व्यक्त केला. त्यांनी येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीच्या संघटनात्मक बांधणीला लागा, असेही सांगितले आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
हेही वाचा- हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार मांडणार नागरिकत्व विधेयक
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता महाशिवआघाडीचे सरकार येणार नाही. आले तरी टीकणार नाही त्यामुळे येणारे सरकार हे भाजपचेच असेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे पाटील यांनी सांगितले.
भाजपने 164 जागा लढल्या होत्या. त्यापैकी 105 जागा जिंकल्या. 59 जागी आमचा पराजय झाला. त्यापैकी 55 जागेवर आम्ही 2 नंबरवर आहोत. पराभव झालेल्या 59 उमेदवारांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होऊनही सर्व उमेदवारांची मानसिकता सकारात्मक आहे. येणाऱ्या ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत, महानगर पालिका निवडणुकांत हे सर्व पुढाकार घेणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले.