ETV Bharat / state

Maharashtra Monsoon Session 2023: अमली पदार्थाच्या प्रमाणावर निर्बंध उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांंगितला प्लॅऩ

अमली पदार्थांच्या वापरावर आळा घालण्यासाठी आणि संबंधितांना कठोर शिक्षा करण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलत आहे. त्यानुसार आता अमली पदार्थ बाळगण्याच्या प्रमाणावर निर्बंध घालण्यात येणार आहेत. तर परदेशी व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी डिटेनशन सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. (Maharashtra Monsoon Session 2023)

Home Minister Devendra Fadnavis
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 18, 2023, 3:22 PM IST

मुंबई: अमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर वाढत असून यामुळे तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत ताबडतोब उपाययोजना करुन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदे करावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात केली. यात सोबत अन्य आमदार नाना पटोले, यांनी या प्रश्नावर सरकारने ताबडतोब कारवाई करावी आणि अधिकार कठोर निर्णय घ्यावेत अशी मागणी केली.

जिल्हास्तरावर समन्वय समित्या : दरम्यान लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की केंद्रीय स्तरावर सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांची एक बैठक पार पडली. या बैठकीत दहशतवाद विरोधी पथकाला नोडल एजन्सी म्हणून या बाबतीत नेमण्याचे ठरले आहे. मात्र राज्यभरात अमली पदार्थ विरोधी समन्वय समिती जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आल्या असून पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त या समित्यांमध्ये सहभागी असतील आणि जास्तीत जास्त कारवाई करण्यात येईल.

पोस्ट आणि कुरिअरच्या माध्यमातून पुरवठा : दरम्यान सध्या अमली पदार्थांचा पुरवठा पोस्टाच्या आणि कुरिअरच्या माध्यमातून केला जात आहे यावर सरकारच्या आणि पोलिसांचे बारीक लक्ष असून काही कुरिअर कंपन्यांवा याबाबतीत सूचना देण्यात आल्या आहेत कुरिअर कंपन्यांनी सुद्धा तपासणी करूनच कुरिअर पुढे पाठवावे असे निर्देश देण्यात आले आहेत. कंटेनर कार्गोच्या माध्यमातून अमली पदार्थांचा पुरवठा केला जातो अशा पद्धतीच्या कंटेनरला आता नवीन पद्धतीचे स्कॅनर तयार केले गेले आहेत ज्या माध्यमातून अमली पदार्थ पकडली जातील अशी खात्री फडणवीस यांनी दिली.

डिटेन्शन सेंटर उभारणार : परदेशी लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचा व्यवसाय सुरु केला आहे. मुदत संपल्यानंतरही जे लोक भारतात राहतात, असे अनेक नायजेरियन लोक समोर आले आहेत. अशा लोकांना परत पाठवण्यापूर्वी त्यांनी कुठल्या गुन्ह्यात स्वतःला अडकवून घेऊ नये यासाठी डिटेनशन सेंटर तयार केले आहे. अमली पदार्थांमध्ये जर कोणी आरोपी आढळल्यास 90 दिवसात त्याच्यावर आरोप पत्र दाखल करण्याची गरज असते मात्र अशा प्रकरणांमध्ये ती शक्य होत नाही म्हणून 180 दिवसांची वेळ द्यावी अशी मागणी ही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान जर अशा प्रकरणात आणि कारवायांमध्ये जर कोणी शासकीय अधिकारी अथवा पोलीस अधिकारी आढळल्यास संबंधितांना ताबडतोब बडतर्फ केले जाईल असा इशाराही त्यांनी सभागृहात दिला.

अमली पदार्थाच्या वापरावर निर्बंध : अमली पदार्थाच्या वापरासाठी आणि व्यवसायासाठी वेगळे कायदे आहेत वापरासाठी शिक्षा कमी आहे आणि व्यवसायासाठी ती अधिक आहे त्यामुळे अनेक लोक प्रमाणापेक्षा किंचित कमी अमली पदार्थ बाळगून आपण केवळ वापर करतो असे दाखवतात त्यामुळे आता अमली पदार्थाच्या वापरावरही निर्बंध आणण्याचा सरकारचा विचार आहे असे त्यांनी सांगितले.

असे असेल प्रमाण : अमली पदार्थाच्या वापरांचे प्रमाण बदलले जाणार असल्याने आता या वस्तूंचा मर्यादित साठा ठेवावा लागणार आहे. अमली पदार्थांमधे सध्या २० किलो गांजा. बाळगता येतो त्याचे प्रमाण आता पाच किलो करण्यात येणार आहे त्याच प्रमाणे २० किलो हायड्रोपोनिक गांजा एैवजी एक किलो, एक किलो चरस ऐवजी अर्धा किलो, 50 ग्राम एम.डी. ड्रग ऐवजी 25 ग्रॅम तर अडीचशे ग्रॅम हेराॅइन ऐवजी सव्वाशे ग्रामच बाळगता येणार आहे,

हेही वाचा

  1. Maharashtra Monsoon Session 2023: बार्टीच्या प्रश्नावरून सभागृहामध्ये रणकंदन
  2. Maharashtra Monsoon Session 2023: नीलम गोऱ्हेंना सुनावणी होईपर्यंत उपसभापती पदावर बसण्याचा पूर्ण अधिकार-देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.