ETV Bharat / state

Extension Of Crop Insurance : एक रुपयात पिक विमा अर्ज भरण्याची मुदत वाढवली - application has been extended

शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज भरण्यासाठीची मुदत वाढ जाहीर करण्यात आली आहे. 31 जुलै ही आधी अंतिम मुदत होती. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरतांना अनेक अडचणी होत्या त्या अनुषंगाने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मुदतवाढी संदर्भात विनंती केली होती. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत तीन ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी आपला भरून घ्यावा असे आवाहन केले आहे.(Extension Of Crop Insurance)

Agriculture Minister Dhananjay Munde
कृषिमंत्री धनंजय मुंडे
author img

By

Published : Jul 31, 2023, 2:43 PM IST

मुंबई: शेतकऱ्यांना पिक विमाचा अर्ज ऑनलाइन भरतांना अनेक अडचणी येत होत्या त्या अनुषंगाने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मुदतवाढी संदर्भात विनंती केली होती, ती मान्य झाली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना मुदत वाढ जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्याला आपल्या शेतातील पिकाचा विमा एक रुपयात उतरवण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र अर्ज करण्याची पद्धत ही संपूर्णतः ऑनलाइन आहे.

Agriculture Minister's tweet
कृषिमंत्र्यांचे ट्विट

मात्र अर्ज भरताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेबसाईट हँग होणे, वेब साईट योग्य प्रकारे काम करत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात होत्या. 31 जुलै विमा अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मात्र राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला मुदत वाढी संदर्भात विनंती करण्यात आली. केंद्र सरकारकडून तशी मुदतवाढ देण्यात आली आहे. एक रुपयात पिक विमा केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्याणी या हंगामात पीक विमा भरण्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.

आत्तापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी अर्ज केले आहेत. अर्ज करताना तांत्रिक अडचणी मुळे कोणताही शेतकरी पिक विमा अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये. अशी शासनाची भुमिका आहे. गेल्या २४ तासात ७ लाख २० हजार शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरला आहे. मात्र अद्याप अनेकांना तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचा अर्ज भरताना अडचण येत असल्याचा तक्रारी होत्या.

याकरता ऑनलाइन विमा अर्ज करण्याची मुदत तीन दिवस वाढवून देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला नसेल त्यानी आपला विमा अर्ज 3 ऑगस्ट च्या आत भरून घ्यावेत असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत केले आहे. गेल्या महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत असताना जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यात पावसाने हजेरी लावली मात्र अनेक जिल्ह्यात पाऊस नाही त्यामुळे पाणीटंचाईची झळ शेतकऱ्यांच्या पिकाला बसण्याची शक्यता आहे. पिक विमा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. एक रुपयात पिक योजनेसाठी राज्यतील बहुतेक शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज भरण्यासाठी सीएससी सेंटरवर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.