ETV Bharat / state

Thackeray vs Shinde : ठाकरे गटाला झटका; आतापर्यंत 36 माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' - महाविकास आघाडी सरकार

Thackeray vs Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं बहाल केल्यानंतर शिवसेनेमध्ये अनेक पक्षांचे माजी नगरसेवक, नेते मंडळींचं इन्कमिंग सुरू झालं. मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाचे तब्बल 36 नगरसेवक आतापर्यंत शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

Thackeray vs Shinde
36 माजी नगरसेवक शिंदे गटात सामील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 1:56 PM IST

Updated : Oct 8, 2023, 5:41 PM IST

मुंबई Thackeray vs Shinde : शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटात गळती सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी उबाठा गटाचे माजी नगरसेवक विष्णू सावंत आणि माजी नगरसेविका विनया सावंत यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर, मंत्री उदय सावंत, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदींची उपस्थित होती.

काय म्हणाले विष्णू सावंत : यावेळी बोलत असताना विष्णू सावंत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे नेते सूरतला गेले, तेव्हा फार दुःख झालं. मात्र, राज्यात परत आल्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सामान्य जनतेसाठी हिताचे निर्णय घेतले. तसंच लोकोपयोगी कामांचा धडाका लावला ते पाहून माझं मन बदललंय. जेव्हा इर्शाळवाडी दुर्घटना घडली, त्यावेळी सर्वात अगोदर पोहोचून स्वतःला कामात झोकून देणारा मुख्यमंत्री मी तेव्हा पाहिला, असं विष्णू सावंत म्हणाले.

घरी बसून साधं नगरसेवक पदही भूषवता येत नाही : यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांचं आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. पुढं ते म्हणाले की, ठाकरे गटातून येणाऱ्या मुंबईतील नगरसेवकांची संख्या आता 36 पर्यंत पोहचलीये. ही संख्या इथं थांबणार नाही, तर येणाऱ्या काळात वाढणारचं आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, त्यांना त्यांच्या प्रभागातील रखडलेली विकासकामं पूर्ण करण्यासाठी नक्की विकासनिधी देण्यात येईल, असंही ते म्हणाले.

ठाकरेंना लगावला टोला : उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री पद घरी बसून सक्षमपणे भूषवता येतं, अशा प्रकारचे मत काहीजण व्यक्त करतात. मात्र घरी बसून साधं नगरसेवक पदही भूषवता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महापूर घरी बसून फेसबुकवरुन हाताळता येत नाही, त्यासाठी फिल्डवर जावं लागतं, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला. तसंच आपण कोकण दुर्घटना, महालक्ष्मी एक्सप्रेस, कोरोना काळामध्ये फिल्डवर उतरुन स्वतः लोकांमध्ये जाऊन कामं केली. यामुळे अधिकारी वर्ग अलर्ट राहतो आणि जनतेचे प्रश्न मार्गी लागतात. अनेक जण मुख्यमंत्री कुठे असा प्रश्न विचारतात, त्यांना मला उत्तर द्यायचंय की, मी मुख्यमंत्री नाही तर सामान्य कार्यकर्ता म्हणूनच पुढं राहणार, असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. Thackeray Vs Shinde : मुंबईत ठाकरे-शिंदे गटात बॅनरवॉर; शहरातील अनेक भागात दोन्ही गटांकडून बॅनरबाजी
  2. Maharashtra Politics Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल 'या' आठवड्यात? सर्वांची उत्कंठा शिगेला
  3. Shinde Vs Thackeray In SC : सत्तासंघर्षाची सर्वोच्च लढाई! राज्यपालांच्या भूमिकेवर न्यायालयाने उपस्थित केले कळीचे प्रश्न

Last Updated : Oct 8, 2023, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.