ETV Bharat / state

Bhaskar Jadhav on Mohit Kamboj : मोहित कंबोज यांनी एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा- भास्कर जाधव

author img

By

Published : Feb 28, 2023, 2:53 PM IST

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोहित कंबोज यांनी राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरादरम्यान भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना १०० फोन केले होते. तसेच ४० आमदारांच्या संपर्कात होते असे आरोप भास्कर जाधव यांच्यावर केले होते. यावर भास्कर जाधव यांनी मोहित कंबोज यांना खुले आव्हान दिले आहे, तसेच बोलताना हे सर्व आरोप तथ्यहिन असल्याचे सांगितले आहे.

Maharashtra Politics
भास्कर जाधव
प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई : मोहित कंबोजने ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ते माध्यमांशी बोलत होते. तेव्हा भास्कर जाधव म्हणाले, सरकारने सुसंस्कृत राजकारण करायला हवे. मी एकमेकांचा आदर करत आहे. परंतु मागील काही दिवस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून बघितले जाते. परंतु ती परिस्थिती आता राहिली नाही आहे. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनी हे बघायला पाहिजे. २२ जूनला एकनाथ शिंदे यांना पक्षात घ्या, असे सांगितले होते. ४० आमदारांना घेऊन भास्कर जाधव गोहाटीला गेले, त्या सर्वांना फोन केले. असे आरोप कंबोज यांनी भास्कर जाधव यांच्यावर केले होते.

एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा : यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना १०० फोन केले. जोपर्यंत मला पक्षात घेत नाही, तोपर्यंत मी गोहाटी सोडणार नाही असे सांगितले, असा आरोप मोहित कंबोज यांनी माझ्यावर केला आहे. त्यावर मी मोहित कंबोज यांना इतकेच सांगू इच्छितो की, मोहित कंबोज यांनी एक तरी आरोप सिद्ध करून दाखवावा. तुमच्याकडे सर्व काही यंत्रणा आहे. मी आजपर्यंत अनेक पक्षात गेलो. पण कधीच लाचारी पत्करली नाही, असे सांगत भास्कर जाधव यांनी मोहित कंबोजसहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक प्रकारे इशारा दिला आहे.

सभागृहात बोलू दिले जात नाही : पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, २०१३ मध्ये भाजपमध्ये सामील झालेला मोहित कंबोज आज पक्षात इतका मोठा कसा झाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मला सभागृहात बोलू दिले जाऊ नये, म्हणून सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे, असाही आरोप भास्कर जाधव यांनी केला. मागच्या अधिवेशनात याचा फटका जयंत पाटील यांना सहन करावा लागला. असा धमकी वजा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसून येत आहे. अशा पद्धतीने कंबोज यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना भास्कर बोलत होते. आपल्यावर लावलेले आरोप सिद्ध करून दाखवण्याचे त्यांनी कंबोज यांना आवाहन दिले आहे. त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा : Shiv Sena Chief Whip MLC: विपल्व बजोरिया यांची विधानपरिषद प्रतोदपदी निवड करा, शिंदेंचं पत्र.. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'विचार करून निर्णय'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.