ETV Bharat / state

Bhiwandi Crime Branch raided : 'लवली' बारवर छापा, बारबालांचे ग्राहकांशी विभत्सवर्तन, ११ बारबालासह १६ जण ताब्यात... - बारबालांचे ग्राहकांशी विभत्सवर्तन

मुंबई - नाशिक महामार्गावर ऑर्केस्टाबारच्या नावाखाली 'लवली' बारमध्ये (Lovely bar on Mumbai Nashik highway) काही वेगळेच सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे बारबालांचा डांस सुरु असतांनाच भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा (team of Bhiwandi Crime Branch raided) टाकुन कारवाई केली.

Bhiwandi Crime Branch raided
लवली बारवर छापा
author img

By

Published : Nov 21, 2022, 7:08 PM IST

ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गावर ऑर्केस्टाबारच्या नावाखाली 'लवली' बारमध्ये (Lovely bar on Mumbai Nashik highway) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपडयावर बारबाला विभत्सवर्तन करत 'सरकाय लो खटिया जाडा लगे, या हिंदी गाण्यावर ग्राहकांशी अश्लीलचाळे करत, असतानाच भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा (team of Bhiwandi Crime Branch raided) टाकला. या छापेमारीत ११ बारबालासह बार चालक, मॅनेजर, कॅशियर , वेटर अश्या १६ जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.

'सरकायलो खटिया' या हिंदी गाण्यावर पोलीस पथकाची इंट्री : भिवंडी तालुक्यातील सरवली, ठाकूरपाडा येथे मुंबई नाशिक महामार्गावर (हॉटेल शेरे पंजाब )च्या नावाखाली 'लवली' नावाचा आर्केस्टा बार आहे. येथे आर्केस्टा बारच्या नावाखाली शासनाच्या नियमाची पायमल्ली करून, क्षमतेपेक्षा अधिक बारबाला उशिरापर्यत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपडयावर अश्लील हावभाव करीत असल्याची माहिती, भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा बारवर छापा टाकला असता, बारमध्ये बसलेल्या ग्राहकांसमोर 'सरकाय लो खटिया' या हिंदी गाण्यावर तोकड्या कपडयावर बारबाला अश्लीलचाळे करीत विभत्सवर्तन करत असल्याचे पथकाला आढळून आले.

भादंवि कलम २९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल : त्यानंतर सर्वाना ताब्यात घेऊन पंचनामा करत बार चालक महिंदर तेजसिंग, मॅनेजर उमेश शेट्टी, कॅशियर दविंदर कुमार, यांच्यासह दोन वेटर, आणि ११ बारबालांना ताब्यात घेतले गेले. आज (सोमवारी ) पहाटेच्या सुमारास भिवंडी गुन्हे शाखाचे पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांच्या तकरीवरून, कोनगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कडलग करीत आहेत.

भिवंडीत २३च्या जवळपास ऑर्केस्टा बार : भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील मुंबई – नाशिक महामार्गावर व गोदाम पट्यात सुमारे २३च्या जवळपास बार आहे. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पेलेस, नाईट लव्हर्स, सपना, अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पेलेस, इन्जोय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी ऑर्केस्टा- डान्स बारचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी भिवंडीतील एका डान्स बारमधील बारबालावर पैश्याची उधळण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उशिरापर्यत सुरु असलेल्या, ऑर्केस्टा बारवर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. तरी देखील पुन्हा उशिरापर्यत ऑर्केस्टा बार सुरु राहत असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या छापेमारीतून समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.