मुंबई: राज्यात मंडळाच्या परीक्षेत शहर असो किंवा गाव, अभ्यास न करता कॉपी करून उत्तीर्ण होण्याच्या घटना वाढत आहेत. अनेकदा शिक्षण संस्थेचे काही कर्मचारी नियमांचे उल्लंघन करतात. तर काही विद्यार्थी आणि त्यांचे समर्थक मित्र किंवा पालक देखील त्यांना मदत करताना आढळतात. बहुतांशी पालक मात्र कॉपी प्रकार विरोधात आहेत. मात्र ह्या अपप्रकारावर उपाय योजना काही निघत नाही. कॉपी करणाऱ्यांना आळा बसावा म्हणून नुकताच राज्य परीक्षा मंडळाने उत्तर पत्रिका जरी आधी मिळेल. मात्र प्रश्नपत्रिका वेळेच्या 10 मिनिट आधी मिळणार नाही. याचे कारण देखील परीक्षा मंडळाने दिले आहे.
हे आहे मुख्य कारण: परीक्षेच्या दहा मिनिट आधी प्रश्नपत्रिका देण्यामुळे ती व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून प्रसारित होते. परिणामी हजारो विद्यार्थी त्याला बळी पडतात. त्यात काहींचे नुकसान देखील होते. अशा घटनांमध्ये काहींना तुरुंगवाससुद्धा झालेला आहे. कारण बऱ्याचदा आपल्या मित्रांच्या सोबत दांडगाई करून बेकायदा पद्धतीने या सर्व गोष्टी केल्या जातात. मात्र कॉपी होऊ नये यासाठी उरफाटा उपाय परीक्षा मंडळाने घेतल्याचे शिक्षक मुख्याध्यापक आणि पालकांचे म्हणणे आहे. याआधी 10 मिनिट अगोदर प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत होती. तर कॉपी बंदीकरिता हा उपाय योग्य नव्हे, असे त्यांना वाटायचे. कारण 10 मिनिटे आधी पेपर घेतल्यावर प्रश्नपत्रिकेचे वाचन केले जायचे. त्यानंतर निरीक्षण आणि त्यातून कोणते प्रश्न आधी सोडवायचे याचे आकलन आणि नियोजन विद्यार्थी करायचे. मात्र आता ते त्यांना करता येणार नाही.
तर विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम: परीक्षेच्या दृष्टीने उत्तर पत्रिका सोडवण्याचे नियोजन प्रत्येक विद्यार्थी सरावाने करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून दहा मिनिटे आधी सवलत मिळते. त्याचा सराव ते मनात धरून नंतरचे तीन तास पेपर सोडवण्यासाठी करतात. हा सराव त्यांना असल्यामुळे अधिकचे दहा मिनिटे जर दिले नाही. तर विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे मुख्याध्यापक संघटनेचे पांडुरंग केंगार यांनी ईटीवी भारत सोबत संवाद साधताना केला. या संदर्भात ज्योती शर्मा यांनी म्हटले की, आमच्या मुलांना कॉपी आवडत नाही. ते या मार्गाला जात नाहीत. मात्र 10 मिनिटे आधी पेपर द्यायला हवा. अन्यथा विपरीत परिणाम होईल.