ETV Bharat / state

Tata Memorial Hospital News : टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांकडून कॅन्सर रुग्णांची लूट, रुग्णालयातील 11 कर्मचाऱ्यांना अटक

author img

By

Published : Jul 19, 2023, 8:30 AM IST

परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब कॅन्सर रुग्णांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये काम करणारे वॉर्ड बॉय, शिपाई, सफाई कर्मचारी यांनी आर्थिक कमिशनपोटी गरीब कॅन्सर रुग्णांना खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये चाचणी करण्यास लावून कॅन्सरग्रस्त लोकांची लूट केली. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल
टाटा मेमोरियल हॉस्पिटल

मुंबई : परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आर्थिक लुटीचा प्रकार समोर आला आहे. रुग्णाच्या पैशातून आपल्याला कमिशन मिळावे, यासाठी हॉस्पीटलमधील कर्मचारी रुग्णांना खासगी डायग्नोसिस सेंटर पाठवत असायचे. या प्रकरणात हॉस्पिटलच्या एकूण 21 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर 11 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांवर डायग्नोसिस सेंटर चालवणाऱ्यांशी संगनमत करुन रुग्णांना चाचणीसाठी खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवल्याचा आरोप आहे. यामध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, हवालदार, वॉर्ड बॉय, शिपाई तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आर्थिक फायदा हवा होता : हॉस्पिटलमधील सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, हवालदार, वॉर्ड बॉय, शिपाई, आया व सफाई कर्मचारी या पदावर काम करणारे कर्मचारी अधिक पैसा मिळावा यासाठी रुग्णांना खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवत होते. हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांचे इन्फीनिटी सेंटरचे व्यवस्थापक आणि मालक संजय सोनावणे तसेच इतर डाम्नोसिस सेंटर चालविणारे यांच्याशी संगनमत होते. हॉस्पीटलमधील कर्मचारी गुन्हेगारी रॅकेट चालवून उपचाराकरिता आलेल्या गरीब रुग्णांना विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी सेंटरमध्ये पाठवत होते. विशेष म्हणजे रुग्णालयात तात्काळाची सुविधा उपलब्ध असताना देखील कमिशनपोटी रुग्णांना खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पाठवत असायचे. खासगी रुग्णालयात गेल्यानंतर कॅन्सरग्रस्त गरीब रुग्णांकडून अधिक पैसा घेतला जात होता. या पैशातून टाटा मेमोरियल हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांना कमीशन मिळत असायचे. कर्मचाऱ्यांच्या या गोष्टीमुळे रुग्णांची तसेच शासनाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

कर्मचाऱ्यांची नावे : संदिप हरिश्चंद्र गावकर, दिनेश रामचंद्र मोहिते, महेश मंगल सोलंकी, फिरोज इक्बाल खान, जितेंद्र भरवाल, दिनेश रामफेर कलवार, राहुल सुशिल जाधव, आनंद रवि गंगास्वामी,सदानंद नरसिम्हा सपालिगा, रवि गोहन परदेशी, राहुल वसांत महयावशी, नारायण रूपसिंग चौधरी, विकास श्रीपत गरे, राजेश प्रकाश बारीया, राकेश सज्जन परदेशी, सूर्यकांत आबाजी थोरात, आतिप अशोक सोनावणे, अश्विनी अनिल कासले, साकिर आशिक सय्यद, सुनिल चाळके, नरेश. हे कर्मचारी आणि इन्फीनिटी डायग्नोसिस सेंटरचे व्यवस्थापक आणि मालक संजय सोनावणे आणि इतर डाग्नोसिस सेंटर यांच्याविरूद्ध अनिल शिवाजी भोसले यांनी कायदेशीर तक्रार भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.

अटकेत असलेले कर्मचारी : तक्रारीनंतर भारतीय दंड संविधान कलम 409,406, 420 आणि 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरीब कॅन्सर रुग्णांची लूट करणाऱ्या टाटा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना भोईवाडा पोलिसांनी केली आहे. या गुन्ह्यांमध्ये विकास श्रीपत गमरे ( वय 51), नारायण रूपसिंह चौधरी ( वय 47), संजय प्रकाश सोनावणे (वय 42), राकेश सज्जन परदेशी (वय 49), राजेश प्रकाश वारीया (वय 40), संदिप हरिश्चंद्र गावकर, (वय 35) रवी मोहन परदेशी (वय 54) राहुल वसत मायावंशी (वय 36). जितेंद्र रतन भरणवाल (वय 45) सकीर आशिक सय्यद (वय 40) आणि दिनेश रामफेर कलवार (वय 42) यांना अटक करण्यात आली आहे.

या पथकाने केली कारवाई : दरम्यान अटकेतील आरोपींना दादर येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 21 जुलैपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतीसह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोरटे यांच्या मार्गदर्शनाखाली भोईवाडा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक पंकज घाडगे हे करीत असून त्यांना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत मोत्रे व पोलीस उपनिरीक्षक अमित कदम व पथक हे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.