ETV Bharat / state

Summons Against Thackeray And Raut : उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना 'या प्रकरणी' 31 जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी - खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी

'सामना' या मुखपत्रातून संजय राऊत यांनी शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी केली असा आरोप करण्यात आला होता. या अनुषंगाने मुंबई न्यायालयात संजय राऊत तसेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानी केल्याबाबतचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात मुंबई न्याय दंडाधिकारी न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली असता दोघांनाही 31 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.

Summons Against Thackeray And Raut
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 14, 2023, 5:21 PM IST

मुंबई : ठाकरे आणि राऊत यांच्याविरुद्ध दाखल मानहानी याचिकेच्या सुनावणीला दोघेही न्यायालयात गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायदंडाधिकारी यांनी दोघांनाही 31 जुलैला हजर राहण्यासाठीचे समन्स अखेर बजावले. न्यायालयाने ठाकरे आणि राऊत यांचे वकील मनोज पिंगळे यांना विचारले असता समन्स प्राप्त न झाल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला. त्यामुळे न्यायालयाने 31 जुलैला दोन्ही व्यक्तींना हजर राहण्यासाठी समन्स बजावले.

काय आहे प्रकरणाची पार्श्वभूमी - राहुल शेवाळे हे बाळासाहेबांची शिवसेना या एकनाथ शिंदे नेते असलेल्या पक्षात आहेत. ते आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये होते. शिंदे गटात गेल्यानंतर एकमेकांवर आरोप झाले आणि राहुल शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार यांच्यावर सामना वृत्तपत्रातून आरोप करण्यात आला. त्यानुसार, शेवाळे यांचा पाकिस्तानमध्ये रियल इस्टेटचा व्यवसाय असून त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. ही बाब व्यक्तिशः राहुल शेवाळे यांची बदनामी करणारी आहे, असे म्हणत त्यांनी मुंबई न्यायालयात याबाबत खटला दाखल केला आहे. त्या संदर्भातील कायदेशीर नोटीस देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामना संपादक संजय राऊत यांना बजावलेली आहे. आज दोन्ही नेते गैरहजर राहिल्यामुळे 31 जुलै यांना व्यक्तिशः हजर राहण्याचे समन्स अखेर न्यायदंडाधिकाऱ्यांनी जारी केले.

लेख प्रकाशित करण्याचे कारण हास्यास्पद : सामनामध्ये 29 डिसेंबर 2022 च्या अंकामध्ये राहुल शेवाळे यांच्या संदर्भातील आरोप आहे. त्यामध्ये म्हटले गेलेले आहे की, दुबई आणि कराचीमध्ये बांधकाम व्यवसाय अर्थात रिअल इस्टेटमध्ये राहुल शेवाळे यांचे हितसंबंध आहेत. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी त्यांच्या वकिलामार्फत 3 जानेवारी 2023 रोजी नोटीस पाठवली होती. कोणत्या आधारावर या पद्धतीचा आरोप केला गेला होता असा सवाल देखील विचारला होता. त्यासंदर्भात राहुल शेवाळे यांच्या प्रश्नाला सामनाच्यावतीने उत्तर देखील दिले गेले होते. त्या उत्तरादाखल दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये दावा केला गेला आहे की, इंटरनेटवर या संदर्भात चर्चा करणाऱ्या एका महिलेकडून ही माहिती समजली आणि त्या माहितीच्या आधारावर हा लेख प्रकाशित केला गेला होता; परंतु या उत्तराने समाधान न झाल्यामुळे राहुल शेवाळे यांनी त्यांच्या वकील चित्रा साळुंखे यांच्या वतीने मुंबई दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली आणि शंभर कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला देखील दाखल केला.

हे तर बदनामी करणारे वक्तव्य : आज मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली असता राहुल शेवाळे यांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानुसार, ज्यांनी एका पक्षासाठी काम केले त्यांच्यावर खोटे आरोप करणे हे नैतिकतेत बसत नाही. याचे परिणाम भोगावे लागेल. ज्याअर्थी पाकिस्तानमध्ये शेवाळे यांचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे आणि त्या देशाशी संबंध आहे, असे आरोप करणे म्हणजे माझी बदनामी करणारे व्यक्तव्य आहे. राहुल शेवाळे यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 31 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.