मुंबई: 12 फेब्रुवारी 2023 रोजी अनिकेत अंभोरे यांनी आयआयटीच्या वसतिगृहातून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर त्या संदर्भातला विशेष तपास आयआयटी प्रशासनाने स्वतः सुरू केला. दुसरा एक तपास स्वतंत्र एसआयटी स्थापन पोलीसांचे पथक करत आहे. मात्र आयआयटीचा तपास हा प्राध्यापक नंदकिशोर समितीद्वारे करण्यात आला आहे. हा केलेला तपास अनेक बाबींची सखोल चौकशी करत नाही. असे आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल या आयआयटीच्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
अशीच एक आत्महत्या: काही वर्षांपूर्वी आयआयटी मधील दलित विद्यार्थी अनिकेत अंभोरे यांनी देखील अशीच आत्महत्या केली होती. त्यावेळेला आयआयटी वतीने एके सुरेश कमिटी स्थापन झाली होती. त्यावेळेला अगदी याच प्रकारचा निष्कर्ष काढला गेला होता. त्यामुळे जातीय भेदभावातून त्याला छाळण्यात आले होते. ही बाब दुर्लक्षिली गेली असे देखील आंबेडकर फुले पेरिया स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
वरवर चौकशी: दर्शन सोळंकेच्या मृत्यू बाबत अंतरिम अहवालाच्या संदर्भात आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कलला ईमेलद्वारे तो रिपोर्ट प्राप्त झाला आहे. रिपोर्टमध्ये दर्शन सोळंकीचा केवळ डीएस असा दोन अक्षरी उल्लेख म्हणजे आयआयटी प्रशासन किती उथळ आणि वरवर चौकशी करते हे देखील त्यातून स्पष्ट होते अशी टीका देखील करण्यात आलेली आहे.
शवविच्छेदनच्या संमती का घेतली नाही : शवविच्छेदन करतेवेळी नातेवाईकांची संमती का घेतली नाही? परस्पर वेगाने शवविच्छेदन का केले ?तसेच आयआयटी सारख्या अतिउच्च अशा नावाजलेल्या शिक्षण संस्थेने दर्शन सोळंकी याचा मृत्यू झाल्यावर अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून त्याच्या घरी फोन करणे, हे बाब नेमकी काय सांगते. तसेच अनेक संघटनांनी मागणी केली होती की, या आयआयटीच्या अंतर्गत विशेष तपास पथकामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश, याबाबतचे अनुभव असणारा कार्यकर्ता आणि तशा केसेस लढवणारे वकील अशा व्यक्तीं देखील त्यात समितीचा भाग असायला हवे होते. की जे आयआयटीचे सदस्य नाहीत. त्यांचा या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश नव्हता.
अवैज्ञानिक पद्धतीचा अहवाल: ज्या आयआयटी प्रशासनाबाबतच आरोप होता आणि प्रश्नचिन्ह होते. तेच आयआयटीचे प्रशासनातील लोक या चौकशी पथकामध्ये होते. त्यामुळे बाहेरील जबाबदार अनुभवी तीन सदस्य यामध्ये असले पाहिजे होते. ही मागणी देखील आयआयटीकडून धुडकावून लावण्यात आली. त्यामुळेच या संपूर्ण तपास पथकाबाबत असे म्हणता येईल की, वैज्ञानिक संस्थेचा अवैज्ञानिक पद्धतीचा हा अहवाल आहे. म्हणून आम्ही याचा निषेध करत असल्याचे देखील आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कलने म्हटलेले आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणारा त्रास: विद्यार्थी संघटनेने हे देखील नमूद केलेले आहे की हा अहवाल म्हणजे संस्थेच्या उणिवा झाकण्याचा फालतू प्रयत्न आहे. आयआयटीमधील विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जाती जमाती सेल हा काय काम करत होते. विद्यार्थ्यांचा मृत्यू रोखण्यासाठी त्याचा काही उपयोग झाला का ? विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे याचा त्रास भोगावा लागतो . परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणारा त्रास, मानसिक छळ त्या दृष्टिकोनातून पाहिलेच गेले नाही. त्यामुळे हा अहवाल निषेध करण्यालायकच आहे.
तपासाबाबत शंका: काही वर्षांपूर्वी आयआयटीमधील मृत्यू पावलेल्या अनिकेत अंभोरेचे वडील संजय अंभोरे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आम्हाला याची कल्पना होती की, दर्शन सोळंकीच्या बाबत हे काय विशेष तपास करतील. कारण माझ्या मुलाचा देखील या प्रकारे मृत्यू झाल्यावर त्यांनी असाच निष्कर्ष काढला होता. परंतु यांनी केलेल्या तपास पथकामध्ये बाहेरील न्यायव्यवस्थेतील, प्रशासनातील तज्ञ अनुभवी व्यक्तींचा यात समावेश केलाच नव्हता. त्यामुळे यांच्या तपासाबाबत शंका घेणे रास्त आहे.
चौकशीबाबत प्रश्नचिन्ह: आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कल या विद्यार्थी संघटनेने अनेक प्रकारे या विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काही आरोप देखील केले आहेत आता येत्या काळात आयआयटी या संदर्भात काय प्रतिसाद देते ते पाहावे लागेल. कारण आयआयटीकडे याबाबत सातत्याने संपर्क साधून देखील कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.