ETV Bharat / state

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; पिक आणि फळ विम्यासाठी राज्य सरकारचा पाठपुरावा - crop insurance and fruit insurance maharashtra

राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-2021मध्ये 148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे.

dada bhuse
दादा भुसे
author img

By

Published : Oct 23, 2021, 3:27 AM IST

मुंबई - नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी तोंडावर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना फळ आणि पीक विमा योजना मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाला पत्र व्यवहार केला आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.

148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे -

राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-2021मध्ये 148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे. केंद्र शासनानेही त्यांच्या हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, अशी मागणी करणारे पत्र कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दिले आहे. तातडीने याबाबत कार्यवाही केल्यास दिवाळीपूर्वी फळपीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकेल, असे या पत्रात नमूद केले आहे.

रब्बी हंगाम 2020-21 मध्ये सुमारे 2.12 लाख शेतकऱ्यांनी फळांसाठी नोंदणी केली. पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेत नोंदणी केली. त्यापैकी 227.52 कोटी रुपयांची भरपाई 1 लाख 4 हजार पात्र शेतकऱ्यांना देय आहे. सुधारित परिचालन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शेतकरी, राज्य आणि केंद्राचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर विमा कंपन्या शेतकऱ्यांचे दावे निकालात काढतात. यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा 106.17 कोटी रुपये आधीच विमा कंपन्यांकडे आहे. तसेच राज्य व केंद्र सरकारचे प्रत्येकी 10.81 कोटी असे एकूण 21.62 कोटी रुपयांचा हिस्साही विमा कंपन्यांकडे जमा करण्यात आला आहे. म्हणजेच एकूण 127.79 कोटी प्रीमियम सबसिडीची रक्कम आधीच विम्या कंपन्यांकडे आहे. आता राज्य सरकारचे अनुदान 149.50 रुपये कोटी विमा कंपन्याना देण्यात आली आहे. केंद्र शासनाचा 148 कोटी रुपयांचा हिस्सा विमा कंपन्यांना देणे बाकी आहे. तो वेळेत मिळावा, असेही मंत्री भुसे यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - विशेष : मुंबईत गेल्यावर्षी ३८४१ आगीच्या घटना, १०० जणांचा मृत्यू तर २९८ जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.