ETV Bharat / state

Maharashtra Electricity price hike: महाराष्ट्रात वीज दरवाढ किती होणार? वीज ग्राहक संघटेनेने सगळा हिशोबच सांगितला! - वीज ग्राहक संघटनेचा दावा

राज्य वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणने 2023-24 आणि 24-25 साठी प्रस्तावित वीज दरवाढ केली आहे. ही दरवाढ पहिल्या वर्षी 11 आणि दुसऱ्या वर्षी 14 टक्के असेल, असा दावा महावितरणातर्फे करण्यात येतो आहे. मात्र प्रत्यक्षात ही दरवाढ 27 ते 37 टक्के होणार असल्याचा प्रति दावा महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेने केला आहे. प्रति युनिट दोन रुपये 75 पैसे वीज दरवाढ होईल, असा दावाही संघटनेकडून अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी आवाज उठवायला हवा असेही ते म्हणाले आहेत.

Maharashtra Electricity price hike
महाराष्ट्रात वीज दरवाढ
author img

By

Published : Jan 31, 2023, 10:16 AM IST

प्रतिक्रिया देताना प्रताप होगाडे, अध्यक्ष राज्य वीज ग्राहक संघटना

मुंबई: यंदा जो सरासरी दर आयोगाने मंजूर केलेला आहे, त्यामध्ये इंधन समायोजन आकारांचा समावेश केलेला आहे. मार्च 2020 ला जे आदेश दिले आहेत, त्या आदेशानुसार यावर्षीचा सरासरी देयक दर हा सात रुपये सत्तावीस पैसे आहे. प्रत्यक्षात महावितरण कंपनीने मात्र हा सरासरी देयक दर हा 7 रुपये 79 पैसे अशा पद्धतीने नमूद केलेला आहे. आत्ताचा दर 7 रुपये 79 पैसे तर 23- 24 वर्षासाठी 8 रूपये 90 पैसे आहे. फरक वाढ 14 टक्के आहे. त्याच्यापुढे 24-25 वर्षासाठी 92 म्हणजे फरकवाढ अकरा टक्के आहे. मात्र हे ही गणित चुकीचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण 7 रूपये 79 पैसे जरी मान्य केले तरी तो आठ रूपये नव्वद पैसे होतो. पुढच्या वर्षी ही वाढ सव्वा चौदा टक्के आहे. 14.25 नंतरची जी वाढ आहे, ती वाढ अकरा टक्के येत नाही तर ती जास्त येते. एकूण वाढ ही 27.34 टक्के इतकी होते, असा दावा महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे.

इंधन समायोजन पद्धत: 2018 पर्यंत आयोगाने जे काही आदेश दिले, त्या आदेशामध्ये इंधन समायोजन पद्धतीने समावेश केला जात नव्हता. केव्हाही तुलना ही एका समपातळीवर केली पाहिजे. म्हणजे मार्च 2020 च्या आदेशानुसार झालेले दर आणि आता एमईआरसीच्या आदेशानुसार होणारे यांचे तुलना झाली पाहिजे. एप्रिल 2023 मध्ये यांची तुलना झाली पाहिजे. पण प्रत्यक्षात पहिले दोन वर्ष अजिबात नव्हता आणि तिसऱ्या वर्षी गेल्या वर्षी सुरुवातीला एप्रिलमध्ये पंधरा वीस पैसे झाला. जूननंतर तो एक रुपये तीस पैसे झाला हे लक्षात घेतले पाहिजे. इंधन समायोजन लागणार नाही, असे ते सांगतात. मागचाही एबीआर आणि आत्ताचा एबीआर या पद्धतीने केला पाहिजे. महावितरण कंपनीला दिलेल्या वाढ ती 67 हजार 644 कोटी रुपये इतकी तुटीची भरपाई आहे. 19 -20 पासून ते 24 -25 पर्यंत या सहा वर्षासाठी आहे. ह्या तुटीची भरपाई आपल्याला दोन वर्षांमध्ये करायची आहे.

जुन्या घराला मिळणारा महसूल: 23- 24 आणि 24-25 या दोन वर्षांमध्ये या दोन वर्षाचा जुन्या घराला मिळणारा महसूल हा कंपनीने छापलेली फक्त बेरीज सांगत आहे. दोन वर्षाचा जुन्या घरांना येणारा महसूल एक लाख 82 हजार 776 कोटी रुपये 67 हजार 681 कोटी रुपये वाढ भागिले एक लाख 82 हजार 776 कोटी रुपये 37 पूर्णांक झिरो तीन टक्के आहे. त्याला आम्ही 37 टक्के म्हणत आहोत. ही वस्तुस्थिती आहे, असा दावाही प्रताप होगाडे यांनी केला.

पावणेतीन रूपये प्रति युनिट दरवाढ: त्यामुळे कंपनीने काही जरी सांगितले तरी प्रत्यक्षामध्ये ग्राहकाला लागणारा फटका हा सरासरी दोन रुपये पंचावन्न पैसे आहे. त्याच्या दरवाढीची आकडेवारी सुद्धा मी दिलेली आहे. ती आकडेवारी जर ग्राहकांनी वाचली की, कळेल वीज आकारांमध्ये वाढ होत आहे. आमच्या हिशोबाने ती 50 टक्के 55 टक्के या दरम्यान होते. आपल्याला दोन रुपये 55 पैसे प्रति युनिट वीज दरवाढ आहे. प्रत्यक्षात ती आणखी पुढे जाऊन पावणे तीन रुपये प्रति युनिट होते, असा दावाही होगाडे यांनी केला आहे.

हेही वाचा: Today Cryptocurrency Price: बिटकॉइन इथेरिअम, बायनान्सच्या किमतीत घसरण; जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.