ETV Bharat / state

आज काय रणनीती ठरणार? सोनिया गांधींनी बोलावली विरोधकांची बैठक, ठाकरेही राहणार हजर - cm uddhav thackeray latest news

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी आज सर्व विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यासह मोठे नेते हजर राहणार आहेत.

THACKERAY
THACKERAY
author img

By

Published : Aug 20, 2021, 3:18 AM IST

मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी आणि केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक समान रणनीती ठरवण्यासाठी आज (20 ऑगस्ट) संध्याकाळी मित्रपक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

'हे' मोठे नेते राहणार हजर

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन असे मोठे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. संध्याकाळी 4 वाजता बैठक सुरू होईल, ज्यात सर्व नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होतील.

संजय राऊतांची माहिती

काही दिवसांपूर्वीच या बैठकीची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली होती. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या घरी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. आता सोनिया गाधींनी सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी होतील, असं राऊत यांनी या अगोदरच सांगितलं होतं.

15 पक्ष राहणार उपस्थित

काही दिवसापूर्वी देखील लोकसभेमध्ये विरोधकांची एकी दिसली होती. आज होणाऱ्या बैठकीत विरोधी पक्षांचे मोठे नेते पुढील वाटचालीवर चर्चा करणार आहेत. 15 छोटे-मोठे पक्ष या बैठकीत सहभागी होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.