मुंबई - दहिसर पूर्व धारखाडी परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आर्थिक कारणावरुन मुलानेच वडिलांची दगडाने ठेचून हत्या केली आहे. अशोक कुमार पांडे (46) असे मृत वडिलाचे नाव आहे. तर रोहन पांडे असे आरोपी मुलाचे नाव आहे.
दहिसर पोलीस ठाण्याच्या धारखाडी भागात पांडे कुटुंबीय राहत होते. पत्नी, मुलगा आणि लहान मुलगी असा त्यांचा परिवार आहे. रोहन हा जरा मानसिक आजारी आहे. त्यामुळे त्याच्या उपचारासाठी पांडे कुटुंबीय अनेक ठिकाणी फिरून त्याचा उपचार करत होते. वडिलांकडे पैशाची मागणी रोहनने केली होती. मात्र वडिलाने पैसे देण्यास नाकार दिला. त्यामुळे अशोक पांडे आणि 21 वर्षीय मुलगा रोहन पांडे यांच्यात वाद झाला. याच वादातून रोहनने दगडाने ठेचून वडिलांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी रोहनला अटक केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - VIDEO धक्कादायक! साडी घातल्याने दिल्लीतील रेस्टॉरंटने महिलेला नाकारला प्रवेश
हेही वाचा - बलात्काराचा बदला बलात्काराने? 2 भावांनी सामूहिक अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप, वाचा...