ETV Bharat / state

Chandrakant Patil : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये निर्वाह भत्ता; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये निर्वाह भत्ता ( Subsistence allowance of Rs 60 thousand ) चंद्रकांत पाटील ( Education Minister Chandrakant Patil ) यांची घोषणा. सारथी आढावा बैठकीत निर्णय घेतला.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Nov 2, 2022, 6:31 AM IST

मुंबई : मराठा समाजाली विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वार्षिक 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय ( Subsistence allowance of Rs 60 thousand ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Technical Education Minister Chandrakant Patil ) यांनी घेतलेला आहे. अनुसूचित जाती ( Scheduled caste ), अनुसूचित जमाती व ओबीसी ( Scheduled Tribes and OBCs ) या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागातर्फे ( Department of Social Justice ) ज्यारीतीने निर्वाह भत्ता दिला जातो, त्याचरीतीने हा भत्ता दिला जाणार आहे.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक निर्वाह भत्ता दिला जाणार : सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्यांक अशा विविध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये सहाय्य करणे त्यांना उच्च शिक्षणात नियमितपणे भाग घेता यावा. आपल शिक्षण पूर्ण करता यावे. त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी निर्वाह भत्ता दिला जातो. आता त्याच निकषानुसार मराठा समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक निर्वाह भत्ता दिला जाणार आहे.

आढावा बैठक संपन्न : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डिसेंबर पासून 100 मुलांचे वसतीगृह सुरु : मंत्री पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये डिसेंबर पासून 100 मुलांचे वसतीगृह सुरु होईल असे कालबद्ध नियोजन करावे. तसेच याबाबत विभागीय स्तरावर आढावा घेऊन या कामाला गती द्यावी. तसेच वसतीगृहासाठी आवश्यक नियमावली तयार करावी. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सारथी, महाज्योती, संबंधित जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बैठक घेऊन अंतिम नियमावली सादर करावी.

पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना : केंद्र सरकारच्या एनसीईआरटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा 800 प्रमाणे वार्षिक 9 हजार 600 रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू करण्यात आली ( Punjabrao Deshmukh Sarathi Higher Education Scheme ) आहे. या योजनेअंतर्गत देशातील 200 नामांकित राज्याबाहेरील विद्यापीठ, संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख इतक्या मर्यादेत आहे, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.