मुंबई Shraddha Walker Murder Case Update: श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये पाच ते सहा महिन्यांपूर्वी महरौली पोलिसांना सापडलेल्या 13 अवशेषांपैकी एक अवशेष अंत्यसंस्कार करण्यासाठी देण्यात यावा यासाठी अर्ज केला होता. मात्र एक वर्ष उलटून गेलं तरीही त्यातील एकही अवशेष मिळाला नसल्याचं वडिलांनी सांगितलं. त्यामुळे आपल्या लेकीवर अंतिम संस्कार करता आले नाही. तिच्या आत्म्यास शांती मिळाली नसल्याचं विकास वालकर यांनी दुःख व्यक्त केलं आहे. (Vikas Walker)
श्रद्धाच्या आजीचे डोळे पाणावले : अतिशय लाडात वाढलेली श्रद्धा, तिला मी बाप म्हणून कधी एक बोट लावलं नव्हतं. त्या मुलीची झालेली दयनीय अवस्था पाहून मन अस्वस्थ होतं. तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून फेकून दिले होते. हे बाप म्हणून सांगायला मला तीव्र वेदना होत आहेत; मात्र असे क्रूर कृत्य करणाऱ्या आफताब पुनावालाला कठोरातली कठोर शिक्षा देत, कोणतीही दया न दाखवता फासावर चढवण्यात यावं अशी याचना त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे आपल्या नातीची झालेली शरीराची चाळण आणि संपूर्ण कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर याबाबत थकलेल्या डोळ्यांत अश्रू डहाळत श्रद्धाची आजी हिनं देखील अतिव दुःख व्यक्त केलं. श्रद्धाला जशा वेदना झाल्या तशाच वेदना आरोपी आफताब याला फासावर चढवून द्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.
तर साकेत कोर्टाबाहेर उपोषणाला बसणार : अंगावर शहारा आणणारी ही घटना घडून एक वर्ष लोटलं. मात्र अद्याप आरोपीला शिक्षा सुनावली नसल्याचं दुःख श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी व्यक्त केलं. तसंच मनाचं समाधान म्हणून आपल्या लेकीवर अंतिम संस्कार करायचे म्हणून जे काही पूजा विधी करायचे असतात ते केले. मात्र, मुलीचे अवशेष मिळायला इतका उशीर का होतोय? पोलिसांना सापडलेल्या तेरा अवशेषांपैकी एकच अवशेष मागत असून ते का देत नाही आहेत?, पोलिसांना पुरावा म्हणून इतर 12 अवशेष आहेत. तरी देखील एक अवशेष देण्यास पोलीस आणि वकील का नकार देतात असे अनेक प्रश्न विकास वालकर यांना भेडसावत आहेत. महिनाभरात श्रद्धाच्या मृतदेहाच्या सापडलेल्या अवशेषांपैकी एक अवशेष न मिळाल्यास साकेत कोर्टाबाहेर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा विकास वालकर यांनी दिला आहे.
हेही वाचा: