ETV Bharat / state

Paramvir Singh & Sachin Waze : सिंग, वाझे यांच्या चर्चेच्या वेळी उपस्थित चार पोलिसांना नोटीस

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर कथित वसुलीचे आरोपी (Alleged recovery) माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, राज्य सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगासमोर आले, त्यावेळी ते आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे ( Paramvir Singh and Sachin Waze.) यांच्यात बंद दाराआड 45 मिनिट चर्चा झाली होती. त्या चर्चेच्या चौकशीकरिता सचिन वाझे यांच्या सोबत असलेल्या त्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस (Show cause notice to the four policemen) बजावण्यात आली आहे.

Waze and Singh
वाझे आणि सिंग
author img

By

Published : Jan 17, 2022, 1:28 PM IST

मुंबई: परमवीर सिंग आणि सचिन वाझे (Paramvir Singh and Sachin Waze.) यांच्यात दोघेही 45 मिनिटे चर्चा झाल्याचे समोर आले होते. यावेळी काही पोलिसही हजर होते. त्यांनाच आता नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह (Navi Mumbai Police Commissioner Bipin Kumar) यांनी अशा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावत शिस्तभंगाची कारवाई का करू नये? याचे लेखी उत्तर मागितले आहे.

नेमकं काय झालं होतं?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ सहायक उपनिरीक्षक सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगाच्या शेजारी ज्या खोलीत त्यांची कथित गुप्त बैठक घेतली त्या खोलीत एका उपनिरीक्षकासह चार पोलीस उपस्थित होते. मात्र ते इंग्रजीत बोलत असल्याने दोघांमधील संभाषणातील एकही शब्द समजला नाही असा दावा पोलिसांनी केला होता. दोघांमध्ये गुप्त बैठक झाल्याचे कळताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीसंबंधी चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना दिले होते. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली असे वळसे पाटील म्हणाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.