ETV Bharat / state

आज मंत्रिमंडळाचा विस्तार, राष्ट्रवादीच्या 'या' पाच नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब - matoshri shivsena mla latest news

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानामध्ये मंत्रिपदाच्या यादीवर खलबते झाली. यामध्ये अजित पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे, राजेश टोपे आणि अदिती तटकरे या नेत्यांचा मंत्रिमंडळामधील समावेश पक्का झाला आहे, तर शिवसेनेच्या आमदारांना अजूनही मातोश्रीवरून विशेष फोन आलेले नाहीत. त्यामुळे आमदारांमध्ये घालमेल सुरू आहे.

mumbai mantralaya
मुंबई मंत्रालय
author img

By

Published : Dec 29, 2019, 6:56 PM IST

Updated : Dec 30, 2019, 8:18 AM IST

मुंबई - महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेवर येऊन एक महिना झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवेळी ६ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, ऊर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. ऊर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार आज दुपारी होणार असून एकूण 36 आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी यादीवर अंतिम खलबते होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी अजित पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे, अदिती तटकरे आणि राजेश टोपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या आमदारांना अजूनही 'तो' विशेष फोन 'मातोश्री'वरून आला नसल्याने सेनेच्या आमदारांची घालमेल वाढली आहे. दिल्लीत काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते, तर गृह खातेही राष्ट्रवादीकडे येणार असल्याची दाट चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच नेत्यांच्या नावांव्यतिरिक्त दिलीप वळसे पाटील, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. दत्ता भरणे आणि डॉ. किरण लहामरे या नव्या चेहऱ्यांना देखील पवार संधी देण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या गोटात अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अमीन पटेल यांची नावे निश्चित मानली जात आहेत. तर के. सी. पाडवी, संग्राम थोपटे, विश्वजीत कदम यांच्या नावाचीही पक्षात जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा - ...तर महाराष्ट्रातील कानडी लोकांचे कपडे काढून हाकलू

मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक गोपनीयता शिवसेनेत राखली जात असल्याचे चित्र आहे. रविवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सेनेच्या आमदारांना मातोश्रीवरून तो विशेष फोन येणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, संध्याकाळ झाली तरी अजूनही आमदारांना संपर्क साधण्यात आला नसल्याचे सांगितले जात आहे. मातोश्रीशी एकनिष्ठ असलेले परिषदेचे आमदार अनिल परब यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - 'विखेंच्या वक्तव्याला महत्त्व देण्याची गरज नाही'

महायुतीच्या सरकारमध्ये जनतेतून निवडून आलेल्या आमदारांपेक्षा परिषदेत आलेल्या आमदारांना मंत्रिपदे दिल्याने दबक्या आवाजात सेनेत नाराजी व्यक्त होत होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार जनतेतून निवडून आलेल्या आमदारांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यात रवींद्र वायकर, सुनील प्रभू, संजय रायमूलकर, आशिष जैस्वाल, वैभव नाईक, भास्कर जाधव, शंभूराजे देसाई, बालाजी किनी, प्रकाश अबीटकर आणि अपक्ष बच्चू कडू यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
एकीकडे महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना ही विस्तारात संधी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अद्याप बहुजन विकास आघाडी, शेकाप आणि स्वाभिमानी संघटनेच्या कोणत्याही नेत्याचे नाव चर्चेत नाही.

Intro:शिवसेनेच्या आमदारांची घालमेल, अजूनही मंत्रिपदाचा कॉल नाही....

मुंबई 29

प्रलंबित मंत्रांडळाचा विस्तार 30 डिसेंबर रोजी हिणार असून राज्यातल्या एकूण 36 आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. मात्र शिवसेनेच्या आमदारांना अजूनही " तो" विशेष कॉल मातोश्री वरून आला नसल्याने सेनेच्या आमदारांची घालमेल वाढली आहे. दिल्लीत काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी यादीवर अंतिम खलबत होत आहेत.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागू शकते. तर गृह खाते ही राष्ट्रवादीकडे येणार असल्याची दाट चर्चा आहे. राष्ट्रवादी कडून दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांचा मंत्री मंडळात समावेश हिण्याची शक्यता आहे. तर दत्ता भरणे, अदिती तटकरे आणि डॉ. किरण लहामरे या नव्या चेहऱ्यांना ही पवार संधी देण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या गोटात अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अमीन पटेल यांची नावे निश्चित मानली जात आहेत. तर के सी पाडवी, संग्राम थोपटे, विश्वजीत कदम यांच्या नावाची ही पक्षात जोरदार चर्चा आहे.
मंत्री मंडळ विस्तारत सर्वाधिक गोपनीयता शिवसेनेत राखली जात असल्याचे चित्र आहे. रविवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सेनेच्या आमदारांना मातोश्री वरून तो विशेष कॉल येणार असल्याची जोरदार चर्चा होती, मात्र संध्याकाळ झाली तरी अजून आमदारांना कॉल आला नसल्याचे सांगितले जात आहे.
मातोश्री शी एकनिष्ठ असलेले परिषदेचे आमदार अनिल परब यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडणार असल्याचे चित्र आहे. महायुतीच्या सरकारमध्ये जनतेतून निवडून आलेल्या अमदारांपेक्षा परिषदेत आलेल्या आमदारांना मंत्री पदं दिल्याने दबक्या आवाजात सेनेत नाराजी व्यक्त होत होती. मात्र महाविकास आघाडीच्या सरकार जनतेतून निवडणुन आलेल्या आमदारांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यात रवींद्र वायकर, सुनील प्रभू, संजय रायमूलकर, आशिष जैस्वाल, वैभव नाईक, भास्कर जाधव, शंभूराजे देसाई, बालाजी किनी, प्रकाश अबीटकर आणि अपक्ष बच्चू कडू यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
एकीकडे महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना ही विस्तारात संधी मिळणार असल्याची चर्चा होती, मात्र अद्याप बहुजन विकास आघाडी, शेकाप आणि स्वाभिमानी संघटनेच्या कोणत्याही नेत्याचे नाव चर्चेत नाही. Body:...Conclusion:
Last Updated : Dec 30, 2019, 8:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.