मुंबई - निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेना-भाजपकडून मतदारांना आवाहन करण्यासाठी उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील गोरेगाव विधानसभा मतदारसंघात आज पहिला कार्यक्रम सायकल रॅलीचा घेण्यात आला. या रॅलीतून नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले.
या सायकल रॅलीत शिवसेना-भाजप-रिपाइं युतीचे बरेच नेते सामील झाले होते. गोरेगाव अंबामाता मंदिर येथून सुरू झालेली ही सायकल रॅली संपूर्ण गोरेगाव परिसरातून मार्गस्थ झाली. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे, असे आवाहन या रॅलीतून करण्यात आले.
गेल्या ५ वर्षांत मोदी सरकारने जो विकासाचा धडाका लावला आहे. तो तसाच सुरू ठेवण्यासाठी येत्या २९ तारखेला मतदान करण्यासाचे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यावेळी केले.