मुंबई - महाराष्ट्रात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर आता शिवसेनेने गोव्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. गोव्याचे आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले असून गोमंतकचे 3 आमदार मुंबईत दाखल झाले आहेत.
हेही वाचा- कुस्तीपटू बजरंग पूनिया यांना केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडून खेल रत्न पुरस्कार प्रदान
विजय सरदेसाई त्यांच्या आमदारांसमवेत आमच्यासोबत आहेत. तसेच इतरही आमदार आमच्यासोबत आहेत. सरकार सोबत असलेल्या आमदारांसोबत आमचे बोलणे झाले आहे. अनैतिक पायावर उभे असलेल्या गोव्यातील सरकारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
आमदार उदय सामंत यांनी या आमदारांना अंधेरीच्या लेमन ट्री हॉटेलमध्ये ठेवले आहे. आज सकाळी या आमदारांनी संजय राऊत यांच्या भांडुप निवासस्थानी त्यांची भेट घेतली.