ETV Bharat / state

आरे वृक्षतोड प्रकरणी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांना शिवसेनेकडून धमक्या - मुंबई मेट्रो

मुंबई मेट्रो कारशेडच्या बांधकामासाठी झाडे तोडण्याला विरोध केला जात आहे. मात्र, आरेमध्ये 'रॉयल प्लम्स' प्रकल्प उभारताना हजारो झाडे तोडण्यात आली होती. तेव्हा सत्ताधारी शिवसेना झोपली होती का? असा प्रश्न राष्ट्र्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी उपस्थित केला आहे.

कप्तान मलिक, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस
author img

By

Published : Sep 19, 2019, 6:21 PM IST

मुंबई - आरेमधील झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या सदस्यांना शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव धमक्या देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी केला आहे.

आरे वृक्षतोड प्रकरणी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांना शिवसेनेकडून धमक्या

मुंबई मेट्रो कारशेडच्या बांधकामासाठी झाडे तोडण्याला विरोध केला जात आहे. मात्र, आरेमध्ये 'रॉयल प्लम्स' प्रकल्प उभारताना हजारो झाडे तोडण्यात आली होती. तेव्हा सत्ताधारी शिवसेना झोपली होती का? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे. आपल्याला दिल्या जाणाऱ्या धमक्यांबाबत पोलिसांमध्ये तक्रार करून पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा - 'चांद जमीन पर', मुंबईच्या रस्त्यांवर आरजे मलिष्काचं नवं गाणं एकदा पाहाच

गोरेगाव आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारले जाणार आहे. त्यासाठी २७०० झाडे तोडली जाणार आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी या पक्षांच्या प्रतिनिधींनी झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.
दरम्यान, आज (गुरूवार) झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत पुन्हा सदस्यांना धमक्या देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालिका आयुक्तांच्या समोर हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा - पूर्वद्रुतगती महामार्गावरील खड्ड्यात आदळली रुग्णवाहिका; अत्यावश्यक सेवेस उशीर

आज झालेल्या बैठकीत आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला असता, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आम्हाला चोर आणि दलाल असे संबोधण्यात आले. इतकेच नव्हे तर आम्हाला मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत, असे राष्ट्र्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी संगितले.

'रॉयल प्लम्स' प्रकल्पावेळी गप्प का बसले?

आरेमध्ये सुमारे २५० एकरवर रॉयल प्लम्स गृह प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पादरम्यान बंगले, इमारती तसेच हॉटेल बांधण्यात आली. हा प्रकल्प १९९५ मध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात बांधण्यात आला. हा प्रकल्प उभारताना हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. त्यावेळी सत्ताधारी शिवसेनेचे लोक गप्प का बसले? असा प्रश्न कप्तान मलिक यांनी उपस्थित केला आहे. रॉयल प्लम्ससाठी झाडे तोडण्याची परवानगी देणारे कारशेडसाठी झाडे तोडण्याला विरोध करत आहेत. शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

Intro:मुंबई - आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारण्यासाठी झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या वृक्ष प्राधिकरण सदस्यांना शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे धमक्या देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी केला आहे. कारशेडसाठी झाडे तोडण्याला विरोध केला जात असताना याच आरेमध्ये रॉयल पाल्म प्रकल्प उभारताना हजारो झाडे तोडण्यात आली तेव्हा सत्ताधारी शिवसेनेवाले झोपले होते का असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे. आपल्याला दिल्या जाणाऱ्या धमक्यांबाबत पोलिसांमध्ये तक्रार करणार असून पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
Body:गोरेगाव आरेमध्ये मेट्रोचे कारशेड उभारले जाणार आहे. त्यासाठी २७०० झाडे तोडली जाणार आहेत. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण सभेत भाजपा, राष्ट्रवादी आणि वृक्ष तज्ञ् लोकांनी झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान केल्याने झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. यावेळी तज्ञ् मंडळींना धमक्या दिल्यात आल्याने त्यांनी आपल्या वृक्ष प्राधिकरण समितीवरील सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. याच दरम्यान आज झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत पुन्हा सदस्यांना धमक्या देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे या समितीचे अध्यक्ष पालिका आयुक्त असतात त्यांच्यापुढेच असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबतचा खुलासा राष्ट्र्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी केला आहे. आज वृक्ष प्राधिकरणच्या बैठकीत आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला असता स्थायी मसाईटी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडून आम्हाला चोर आणि दलाला असे संबोधण्यात आले. इतकेच नव्हे तर आम्हाला मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. आम्ही मार खायला भीत नाही. मात्र आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत असे मलिक यांनी संगितले. आज जे कारशेडसाठी २७०० झाडे तोडायला नकार देत आहेत त्याच्या पक्षाचे प्रमुख आरेमधील मेट्रो भवनच्या भूमिपूजनाचा उपस्थित राहतात. हा कसला विरोध आहे असा प्रश्न उपस्थित करत याचा खुलासा करावा अशी मागणी मलिक यांनी केली. आपल्याला दिल्या गेलेल्या धमक्यांबाबत पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे मलिक यांनी संगितले.

रॉयल पाल्म वेळी गप्प का बसले -
आरे मध्ये २०० ते २५० एकरवर रॉयल पाल्म प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पादरम्यान बंगले, इमारती तसेच हॉटेल बांधण्यात आली आहे. हा प्रकल्प १९९५ मध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावेळी करण्यात आला. हा प्रकल्प उभारताना हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. त्यावेळी सत्ताधारी शिवसेनेचे लोक गप्प का बसले असा प्रश्न कप्तान मलिक यांनी उपस्थित केला आहे. रॉयल पाल्मसाठी झाडे तोडण्यासाठी परवानगी देणारे आता आरेमधील कारशेडसाठी झाडे तोडण्याला विरोध करत आहेत. शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

नगरसेवक कप्तान मलिक यांचा बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.