मुंबई : निवडणूक चिन्ह दिल्यानंतर महाराष्ट्रात मोठा वाद सुरू आहे. मात्र, शिंदे गटाने पक्षाला नाव मिळाल्यानंतर आता पुढची पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर लगेचच मुंबईच्या हॉटेल प्रेसिडेंटमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. ही बैठक पार पडली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनाच मुख्य नेतेपदी ठेवण्यात आले आहे. पक्षाचे सर्व अधिकार शिंदे यांच्याकडेच देण्यात आले आहे. या बैठकिला शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.
बैठकीत कोणते निर्णय होणार? : शिवसेनेच्या आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यनेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर (1998)साली बाळासाहेबांनी केलेल्या घटनेनुसारच पक्षात काम चालेल असा निर्णय केला जाणार आहे. या बैठकीत घेतला जाणारा सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे कार्याध्यक्ष आणि पक्षप्रमुख ही पदं बरखास्त करण्यात येणार आहेत. सर्वअधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीला देण्याचा निर्णय होणार देखील या बैठकीत घेण्यात येणार आहे. यानंतर अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. सोबतच संसदीय दल, लोकसभा ग्रूप लीडर, सरचिटणीस, कोषाध्यक्ष अशा पदांची निवड होणार आहे.
शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर, खालीलप्रमाणे ठराव
- शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेच राहणार
- शिवसेनेचे पुर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना
- निवडणूक आयोगाने नियम आणि अटी ज्या घातल्या त्याचे पालन करणार
- मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ठराव
- स्वातंत्रविर विदा सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव
- 80 टक्के भूमिपुत्रांना नोकरी देणार
- राज्यातील तरुणांसाठी राज्यात स्पर्धात्मक अभ्यासासाठी सराव वर्ग सुरू करणार
- बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेने शिवसेना चालणार
- बाळासाहेबांचे विचार घेऊन हे पाऊल उचलले आहे तेच विचार घेऊन वाटचाल करणार
- चर्चगेट रेल्वेस्थानकाला चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याच ठराव
हेही वाचा : Narhari Zirwal : मी जी कारवाई केली ती कायद्यानुसारच केली -नरहरी झिरवाळ