ETV Bharat / state

Sanjay Raut Threat Case : संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी; पुण्यातून दोघे ताब्यात, पोलीस म्हणाले, आरोपीचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध नाही

author img

By

Published : Apr 1, 2023, 12:32 PM IST

Updated : Apr 1, 2023, 5:24 PM IST

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गॅंगने जीवे मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना पुण्यातून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. आरोपीचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध नाही अशी माहिती मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
पोलीस अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद

मुंबई : लॉरेन्स बिश्नोई गॅंगने मुंबई पोलिसांची झोप उडवली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देऊन लॉरेन्स बिश्नोई गँगने खळबळ माजवली होती. आता संजय राऊत यांना धमकीचे मेसेज आल्यानंतर कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात संजय राऊत यांनी लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतर मुंबई पोलीसांनी तपासाची चक्रे तात्काळ वेगाने फिरवली आहेत. या घटनेत पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या आरोपीने धमकी देताना लॉरेन्स बिश्नोईंच्या नावाचा वापर केल्याने सलमान खान धमकी प्रकरणात याचा काही सहभाग आहे का हेही तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीचा लॉरेन्सशी संबंध नाही - खासदार संजय राऊत धमकी प्रकरणी डीसीपी पुरुषोत्तम कराड यांनी पत्रकार परिषद घेतली. खासदार संजय राऊत यांना धमकी देणारा राहुल तळेकर याचा लॉरेन्स बिश्नोई याच्याशी कुठलाही संबंध नसल्याचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम खराड यांनी सांगितले आहे. राहुल तळेकर हा पुण्यातील रहिवासी असून, त्याचे स्वतःचे हॉटेल आहे. रात्री संजय राऊत यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्याने संजय राऊत यांचा नंबर मिळवून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊत यांनी त्याचा फोन उचलला नाही म्हणून त्याने राऊत यांना लॉरेन्सच्या नावाने धमक्या दिल्या असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दारुच्या नशेत आरोपीने दिली धमकी - मुंबई पोलिसांचे पथक हे राहुल तळेकर याला कांजुर पोलीस ठाण्यात आणून त्याची अधिक चौकशी करणार आहे. युट्यूबवर सरफिंग करताना त्याला लॉरेन्सबद्दल माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याने संजय राऊतांना धमकी देताना लॉरेन्सचे नाव घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लॉरेन्स बिश्नोई विरोधात गुन्हा - संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईतील कांजूर मार्ग पोलिस ठाण्यात लॉरेन्स बिश्नोई याच्याविरुद्ध कलम ५०६(२) आणि ५०४ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊतांची प्रतिक्रिया - मला धमकी आल्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. शिंदे सरकार आल्यानंतर माझी सुरक्षाही कमी केली आहे. मुख्यमंत्र्यांचा मुलगा एका गुंडाला सोबत घेऊन माझ्यावर हल्ला करण्याचा प्लॅन करत होता. यावर मी एक पत्रही लिहिले होते. मात्र, हा एक स्टंट असल्याचे मला सांगण्यात आले होते. मी जर खरे बोलायचे ठरवले तर मोठा राजकीय भूकंप येईल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी धमकी प्रकरणावर दिली आहे.

  • यह मेरे साथ पहली बार नहीं हुआ है। इस सरकार के आने के बाद हमारी सुरक्षा घटाई गई लेकिन हमने इसके बारे में ज़्यादा नहीं बोला है। मुख्यमंत्री का बेटा एक गुंडे के साथ मुझ पर हमला करने की साजिश करता है इसको लेकर मैं पत्र लिखता हूं तो कहा जाता है कि यह एक स्टंट है। अगर हम सच बोलने पर आ… https://t.co/uBWZEG9x3A pic.twitter.com/n37pUhQ8S0

    — ANI_HindiNews (@AHindinews) April 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुसेवाला टाईपमध्ये मारु: खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मॅसेज खासदार संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू असा हा मॅसेज आहे. दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून टाकू. मुसेवाला टाईपमध्ये मारु. लॅारेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स तयारी करके रखना. त्याच प्रकारे अश्लील शिवीगाळ करत हा मॅसेज करण्यात आला आहे.

सुरक्षेत वाढ करण्याची मागणी: अनेकदा खासदार संजय राऊत यांनी हत्येची सुपारी देण्यात आल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर थेट हे जीवे मारण्याच्या धमकीचे मेसेज आल्याने मोठी खळबळ माजली आहे. याआधी लॅारेन्स बिश्नोई गॅंगकडून बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. आता खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने त्यांच्या देखील सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

  • Maharashtra | Shiv Sena (Uddhav Thackeray) leader & RS MP Sanjay Raut received a threat message from Lawrence Bishnoi gang mentioning murdering him like Punjabi Singer Sidhu Moose Wala in Delhi. Sanjay Raut has filed a complaint. Police are conducting probe: Police

    (File Pic) pic.twitter.com/LXMQKP1fp1

    — ANI (@ANI) April 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली: धमकी मिळाल्यानंतर राऊत म्हणाले की, असे पहिल्यांदाच घडलेले नाही, केंद्रातील मोदी सरकारने आमची सुरक्षा काढून घेतली आहे. या संदर्भात मी कोणतेही पत्र लिहिलेले नाही. त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्र्यांचा मुलगाही माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचतो. मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर आतापर्यंत काय केले, असा सवाल त्यांनी गृहमंत्र्यांना केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया: संजय राऊत यांना जी धमकी आली आहे त्या संदर्भात धमकी देणारा व्यक्ती आयडेंटिफाय झाला आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे त्याने दारूच्या नशेमध्ये अशी धमकी दिली आहे. यासंदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल. महाराष्ट्रमध्ये कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. कोणताही व्यक्ती असला तरी कारवाई होईल.

गुन्हेगारांवर वचक नाही: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून गृह खात्याला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. लोकप्रतिनिधींना धमक्या देईपर्यंत गुन्हेगारांची हिम्मत वाढली असून, गृह खात्याचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही, अशी सडकून टीका सुळे यांनी केली.

हेही वाचा: Sanjay Raut News लाकूड तुम्ही देत आहात पण हातोडा आम्हीच मारला आहे संजय राऊत

Last Updated : Apr 1, 2023, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.