मुंबई Sharad Pawar On Nanded Death Case : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष ( शरद पवार गट ) शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यातील शासकीय यंत्रणांचं हे अपयश असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे आता नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरुन राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. दोनच महिन्यांपूर्वी ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेला…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. दोनच महिन्यांपूर्वी ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेला…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 2, 2023नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासात १२ नवजात बालकांसह २४ जणांचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना ही अक्षरशः मन हेलावून टाकणारी आहे. दोनच महिन्यांपूर्वी ठाण्यातील महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेला…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 2, 2023
काय म्हणाले शरद पवार : नांदेड इथल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूत 12 चिमुकल्यांचा समावेश आहे. ही घटना मन हेलावून टाकणारी आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात अशाचप्रकारे दोन महिन्यापूर्वी 18 जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला गांभीर्यानं न घेतल्यानंच नांदेडमधील घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. यातून शासकीय यंत्रणांचं अपयश स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी वेळीच अशा घटनांकडं गांभीर्यानं लक्ष देऊन, यासाठी ठोस पावलं उचलावीत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शरद पवार यांनी नांदेडच्या घटनेबाबत आपलं मत 'एक्स'वर स्पष्ट केलं आहे.
-
"Shows failure of govt systems": Sharad Pawar slams Maharashtra govt after 24 including 12 newborns die in 24 hours
— ANI Digital (@ani_digital) October 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/VAyzkflOxC#Maharashtra #Nanded #SharadPawar pic.twitter.com/POQBrH9ytB
">"Shows failure of govt systems": Sharad Pawar slams Maharashtra govt after 24 including 12 newborns die in 24 hours
— ANI Digital (@ani_digital) October 2, 2023
Read @ANI Story | https://t.co/VAyzkflOxC#Maharashtra #Nanded #SharadPawar pic.twitter.com/POQBrH9ytB"Shows failure of govt systems": Sharad Pawar slams Maharashtra govt after 24 including 12 newborns die in 24 hours
— ANI Digital (@ani_digital) October 2, 2023
Read @ANI Story | https://t.co/VAyzkflOxC#Maharashtra #Nanded #SharadPawar pic.twitter.com/POQBrH9ytB
काय आहे नांदेड रुग्ण मृत्यू प्रकरण : नांदेड इथल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. या 24 रुग्णांमध्ये 12 चिमुकल्यांचाही समावेश आहे. तेलंगाणा राज्यातील अनेक रुग्ण या रुग्णालयात येत असल्यानं रुग्णांचा भार वाढल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता आर एस वाकोडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे औषधांचा तुटवडा असल्यानं रुग्णांचा मृत्यू ओढवल्याचंही त्यांनी यावेळी सांगतिलं. मागील 24 तासात 12 नवजात बालकांचा मृत्यू झाला. यात सहा मुलं आणि सहा मुलींचा समावेश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :