मुंबई : सागर बर्वे हा एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी दिली. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक हंचाळकर यांच्याकडे तातडीने परवा तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसाने चक्र गतिमान फिरवल्यानंतर त्वरित आरोपी सागर बर्वे याला पोलिसांनी अटक केली होती.
पुराव्या अभावी जामीन दिला : आज त्या संदर्भात सुनावणी झाली. मुंबईच्या किला कोर्टात आरोपीला हजर केले असता त्याच्या विरोधात सबळ पुरावे पटलावर उपलब्ध होत नाही, अशी बाजू त्याच्या वकिलांनी मांडली. नर्मदाबाई पटवर्धन या फेसबुक खात्यावरून शरद पवार यांना जी धमकी दिली गेली, त्या फेसबुक खात्यासोबत याचा संबंध जुळत नसल्याचे न्यायालयामध्ये आरोपीच्या बाजूने ठोसपणे मांडले गेले. न्यायालयाने ही बाजू ग्राह्य धरत पुराव्या अभावी त्याला जामीन दिला आहे.
फेसबुक पोस्टद्वारे धमकी : एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या 34 वर्षीय सागर बर्वेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फेसबुक पोस्टद्वारे धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली. बर्वे यांने नर्मदाबाई पटवर्धन यांच्या नावाने पोस्ट टाकली होती की, पवारांना बुद्धिवादी नरेंद्र दाभोलकरांप्रमाणे मारले जाईल. बर्वे याला रविवारी एस्प्लानेड न्यायालय अर्थात कीला कोर्टात हजर केले होते. मात्र प्राथमिक तपासात बर्वे यांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याचे पोलिसांकडून समजले.
चौकशीची मागणी : या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने एफआयआर दाखल केला होता. शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. आज झालेल्या सुनावणीमध्ये पोलिसांनी त्याच्या आधी चौकशीची मागणी केली, परंतु ठोस पुरावा उपलब्ध नाही. ही बाब आरोपीच्या वतीने जोरदारपणे मांडल्यामुळे न्यायालयाने कोणताही पुरावा ठेवत दिसत नसल्यामुळे आरोपी सागर बर्वे याला जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचा :
- Sharad Pawar Death Threat : शरद पवारांना धमकी देणाऱ्या तरुणाचे हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध..पुण्यातून अटक
- Sharad Pawar Threat Case: शरद पवार यांना मारण्याची धमकी देणारा निघाला सॉफ्टवेअर इंजिनिअर; मुंबई गुन्हे शाखेने केली अटक
- Nitin Gadkari On Road : देशातील रस्त्यांचे जाळे नऊ वर्षात वाढले 59 टक्क्यांनी; अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर - नितीन गडकरी