ETV Bharat / state

राज्यात आतापर्यंत 17 बालकांचा कोरोनामुळे मृत्यू - कोरोना इफेक्ट बातमी

राज्यात 0 ते 10 वयोगटातील 6 हजारहुन अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील 2 लाखाहून अधिक रुग्णांच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याने ही दिलासादायक बाब आहे. तर यातील अवघ्या 17 लहान मुलांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ही आकडेवारी 4 जुलैपर्यंतची आहे असे डॉ. आवटे यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत राज्यात 17 लहानग्यांचा मृत्यू
आतापर्यंत राज्यात 17 लहानग्यांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 6, 2020, 4:24 PM IST

मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या 0 ते 10 वयोगटातील रुग्णांच्या मृत्यूची नोंद आतापर्यंत झाली नव्हती. परंतु, काही दिवसांपूर्वी मुंबईत 0 ते 10 वयोगटातील 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर, आता राज्यातील या वयोगटातील मृत्यूचींही नोंद झाली आहे. त्यानुसार राज्यात 3 जुलैपर्यंत 0 ते 10 वयोगटातील 17 लहानग्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे.

0 ते 10 आणि 10 ते 20 या वयोगटातील मुलांना कोरोनाचा संसर्ग कमी होतो हे जगभरात दिसून आले आहे. त्यातही 85 टक्के मुलांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने, लसीकरण झाल्याने ते सहज कोरोनावर मात करत आहेत. मात्र, त्याचवेळी काही मृत्यू मात्र होताना दिसत आहेत. मुंबईत 30 जूनपर्यंत 1 हजार 311 लहानग्यांना कोरोनाची लागण झाली असून यातील 7 बालके दगावली आहेत. अशात आता राज्यातील आकडेवारीही समोर आली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात 0 ते 10 वयोगटातील 6 हजारहुन अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील 2 लाखाहून अधिक रुग्णांच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याने ही दिलासादायक बाब आहे. तर यातील अवघ्या 17 लहान मुलांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ही आकडेवारी 4 जुलैपर्यंतची आहे असे डॉ. आवटे यांनी सांगितले आहे. तर, एकूण मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी असून लागण ही लहान मुलांच्या तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात 8 हजार 800 हुन अधिक मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत 10 वर्षाखालील रुग्णांचा मृत्यूदर हा खूपच कमी आहे. त्यामुळे ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. मुंबई वा राज्यात 10 वर्षाखालील मुलांचे जे 17 मृत्यू झाले आहेत, ते कोरोनामुळे आहेत. परंतु, त्याचवेळी ही मुलं कमजोर, कुपोषित असल्याने वा त्यांना बरोबरीने इतर आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, असे असले तरी त्याचवेळी मुलांना संसर्गापासून वाचवणे आणि त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.