मुंबई : ताडदेव येथे व्हिक्टोरिया मेमोरियल अंधशाळा आहे. या शाळेमधील ७ विद्यार्थ्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सात पैकी पाच मुलांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला, तर दोन मुलांना ताप आला आहे. नायर रुग्णालयात दाखल करणाऱ्या करण्यात आलेल्या सात मुलांपैकी पाच मुले ही बारा वर्षावरील आहेत. तर, दोन मुले बारा वर्षाखालील आहेत. या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याचे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून कळवण्यात आले आहे.
पाच मुले ही बारा वर्षावरील : येथील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने मोठ्या प्रमाणात परिसरात खळबळ उडाली आहे. यातील सर्व विद्यार्थ्याांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधा झालेल्या मुलांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला सुरू झाला आहे. तर यातील दोन मुलांना ताप आला आहे. नायर रुग्णालयात दाखल करणाऱ्या करण्यात आलेल्या सात मुलांपैकी पाच मुले ही बारा वर्षावरील आहेत. तर, दोन मुले बारा वर्षाखालील आहेत.
अशीच घटना घडली होती : काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिपरी तालुक्यात चेक बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सहल गेली होती. या सहलीत सुमारे 52 विद्यार्थी होते. दरम्यान, पार्कमध्ये विद्यार्थ्यांना चिकन खाऊ घातले. यामुळे अकरा विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या विद्यार्थ्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार दिले होते. दरम्यान, शिक्षकांनी इतर लोकांना माहिती दिल्या नसल्याचे पालकांचे म्हणणे होते. या प्रकारावर पालकांनी संताप व्यक्त केला होता.
रुग्णालयात दाखल मुलांची नावे -
- अंकित राऊत 15 वर्षे
- कल्पेश पवार 11 वर्ष
- सुमित सरकार 11 वर्ष
- सोमनाथ मुडकट 14 वर्ष
- अक्षय मोनीस्वारे 14 वर्ष
- शदाफ कुरेशी 17 वर्ष
- परमेश्वर द्मागणे 18 वर्षे
हेही वाचा : Rain Update : अवकाळी पावसाने पिके भुईसपाट, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला