मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर दोन संशयित लोक दिसले आहेत. हे संशयित एका टॅक्सी चालकाला अंबानी यांच्या अँटिलिया घराचा पत्ता विचारत होते. मार्च महिन्यात अँटिलिया बिल्डिंगच्या समोर एक स्कार्पिओ मध्ये जिलेटीन मिळाले होते. त्यामध्ये मनसुख हिरण आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव समोर आलं होते.
सचिन वाझे यांना बडतर्फ करण्यात आले होते. मात्र, गेल्या 8 महिन्यात पुन्हा एकदा अंबानी यांच्या घरासमोर दोन संशयित व्यक्ती आढळल्याचा संशय एका टॅक्सी ड्रायव्हरला आला आहे. त्यानंतर पोलिस यंत्रणा पुन्हा एकदा या तपासाला लागली आहे. मुंबई पोलिसांकडून आता या संशयित व्यक्तींचा तपास सुरू झाला आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये टॅक्सी ड्रायव्हरचा जवाब नोंदवण्यात आला. यावेळी मुंबई पोलिसांचे दोन वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी आणले आहे. आता जवाब नोंदवताना टॅक्सी ड्रायव्हरकडून या दोन्ही व्यक्तींचे रेखाचित्र मुंबई पोलिसांकडून काढण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
टॅक्सी ड्रायव्हरचे स्टेटमेंट केले जाते रेकॉर्ड
सध्या या टॅक्सी ड्रायव्हरचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेतले असून डीसीपी पदाच्या रँकींगचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत, असे मुंबई पोलीसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तसेच, अंबानींच्या घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.ऑटिलिया प्रकरणी मुंबई पोलिसांकडून स्टेशन डायरी नोंद करण्यात आली आहे. यात टॅक्सी ड्रायव्हर करून जवाब नोंदणी सुरु आहे. तपासात काही आढळल्यास गुन्हा दाखल करणार आहेत.
हेही वाचा - ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांविरोधात मानहानीची याचिका; 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी
काय सांगितले टॅक्सी चालकाने ?
टॅक्सी चालकाने तात्काळ मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. आझाद मैदान पोलीस ठाण्यात टॅक्सी चालकाचा जबाब नोंदवण्यात येत आहे. टॅक्सी ड्रायव्हरने सांगितले की, 'दोन लोक त्याला बॅग घेऊन मुकेश अंबानींचे घर अँटिलियाचा पत्ता विचारत होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी अँटिलियाची सुरक्षा वाढवली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरात नाकाबंदीही करण्यात आली आहे.
अंबानींच्या बंगल्याबाहेर संशयास्पद हालचाली
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर जिलेटीननी भरलेली स्कॉर्पिओ गाडी काही दिवसांपूर्वी आढळली होती. त्यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाशी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला विचारला होता. त्यामुळे, अंबानींच्या घराबाहेरील गाडीचा तपास वेगळ्याच वळणाला येऊन पोहोचला होता. आता, पुन्हा एकदा संशयास्पद हालचाली आढळून आल्या आहेत.
हेही वाचा - आर्यन खान प्रकरण : समीर वानखेडेंची चौकशी करणाऱ्या टीमकडून विविध ठिकाणी पाहणी