मुंबई - चेंबूरच्या टिळकनगर परिसरातील दुर्गा सदन इमारतीत शालेय मुलांनी दिवाळी निमित्त सुटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले मातीपासून तयार करत विविध रंग आणि विद्यूत रोषणाईनी सजवून आपल्यातील कल्पकता सादर करीत सुटीचा आनंद द्विगुणित केला आहे.
शालेय मुलांना दिवाळीची सुटी म्हटली की मजा, मस्ती आणि अभ्यासातून मिळालेली सुटका यात मुले आनंदी असतात. गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान अधिक विकसित झाल्याने मुल सुटीत पारंपरिक खेळाकडे न वळता मोबाईल, कॉम्प्युटर, टिव्ही यासमोर कित्येक तास बसलेले असतात. तर अनेक ठिकाणी मुलं मात्र या तंत्रज्ञानावर आधारित खेळातून बाहेर पडून पारंपरिक खेळ याच बरोबर आपला ऐतिहासिक वारसा टिकून रहावा म्हणून आवडीने किल्ले तयार करतात. चेंबूरच्या टिळकनगरमधील काही मुलांनी एकत्र येत आपल्या रहिवासी इमारतीमध्ये एक किल्ला बनवला आहे. हा किल्ला बनवण्यासाठी या मुलांना 3 दिवसाचा कालावधी लागल्याचे मुलाचे म्हणणे आहे.