ETV Bharat / state

Scholarship Application : शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत अन्यायकारक, मुदत वाढवण्याची पालकांची मागणी

राज्यातील आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज ( Scholarship application ) करण्याची मुदत 31 ऑक्टोबर ( filing scholarship applications ) पर्यंत आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे. दिवाळीच्या सुटीमुळे शाळा नऊ नोव्हेंबरला उघडणार आहे तेव्हा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत अन्यायकारक असल्याचं पालक, शिक्षकांचे म्हणणं आहे.

Scholarship Application
शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत
author img

By

Published : Oct 23, 2022, 9:38 PM IST

Updated : Oct 25, 2022, 4:31 PM IST

मुंबई - राज्यातील आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज ( Scholarship application ) करण्याची मुदत 31 ऑक्टोबर ( filing scholarship applications ) पर्यंत आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे. दिवाळीच्या सुटीमुळे शाळा नऊ नोव्हेंबरला उघडणार आहे तेव्हा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत अन्यायकारक असल्याचं पालक, शिक्षकांचे म्हणणं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ( Maharashtra State Examination Council ) आयुक्त शैलजा दराडे ( Commissioner Shailaja Darade ) यांनी १० ऑक्टोंबर रोजीच पत्र जारी केलं आणि 10 ऑक्टोंबर रोजीच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरायचे असे त्यात म्हटले . शासनाच्या घाईघाईने काढलेल्या परिपत्रकामुळे आर्थिक दुर्बल घटकातील लाखो मुले आठवी मधील शिष्यवृत्ती पासून वंचित राहू शकतात.

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत अन्यायकारक
अर्ज करण्याची मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत -
देशामध्ये आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाते महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे परीक्षा घेऊन ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त होते. महाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करणे सुरुवात केले. याची मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत दिली. मात्र दिवाळीची सुट्टी लागली आणि 9 नोव्हेंबरला शाळा उघडणार त्यामुळे 31 ऑक्टोबर मुदतीमुळे हजारो विद्यार्थी यापासून वंचित राहू शकतात; असे महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नेते सुहास हिर्लेकर यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले.

गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती - इयत्ता आठवी मधल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातल्या ज्या पालकाचे उत्पन्न वार्षिक तीन लाख 50 हजार पेक्षा कमी आहे अशा कोणत्याही विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसता येतं आणि गुणवत्तेच्या आधारे त्यांना शिष्यवृत्ती मिळते यामध्ये मुलगा मुलगी कोणी ही सहभाग घेऊ शकतो सरकारी सरकारी मान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या शाळा यामध्ये आठवीमध्ये शिकलेले कोणतेही नियमित विद्यार्थी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू होते.

या शिष्यवृत्तीसाठीची पात्रता - विद्यार्थी विद्यार्थिनींना इयत्ता सातवी मध्ये 55 टक्के गुण मिळवलेले असावे .तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी पाच टक्के सवलत देऊन 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असेल तरी त्यांना यामध्ये परीक्षेला बसता येते.

पुढील विद्यार्थी परीक्षेसाठी अपात्र असतात- विनाअनुदानित म्हणजे 100 टक्के खाजगी असलेल्या शाळेतील विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीचा लाभ घेणारे ,भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, तसेच सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी यांना या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसता येत नाही

विद्यार्थ्यांची निवड - विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा मधून केली जाते .आणि मिळालेला गुणांच्या आधारे राष्ट्रीय मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणा नुसार विद्यार्थ्यांची निवड होते .ही परीक्षा 18 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात येईल यामध्ये बौद्धिक क्षमता याला 90 गुण असतात एकूण प्रश्न 90 असतात तर शालेय क्षमता चाचणी यामध्ये 90 गुण असतात एकूण प्रश्न नव्वद असतात आणि पात्रता आहे किमान 40% तरी गुण मिळाले पाहिजे आणि अनुसूचित जाती जमाती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32 टक्के मिळणे देखील आवश्यक आहे.

मुदतवाढ करावी - यासंदर्भात मुंबईतील पालक राजेश इवलेकर यांच्याशी ईटीवी भारत ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले "आमची मुलगी कुमारी रिया इवलेकरचा उत्पन्नाचा दाखलाच काढायला वेळ लागणार. सरकारने 10 ऑक्टोबरला परिपत्रक जारी केलं पण, जनतेला समजणार कसे. दिवाळीच्या सुट्ट्या नऊ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे आमच्या मुलांचे नुकसान होऊ शकत. शासनाने त्वरित मुदतवाढ करावी अशी आमची मागणी आहे." या संदर्भात दुसरे पालक महेश जाधव त्यांची मुलगी इयत्ता आठवी शिकते कुमारी तनिष्का जाधव यांचे देखील उत्पन्नाचा दाखला राहिलेला आहे. त्यांनी सांगितले," शासनाने मुदत इतकी कमी दिली की एवढ्या कमी अवधीत उत्पन्नाचा दाखला मिळू शकत नाही त्यामुळे असे हजारो मुले जे आहेत ते यापासून वंचित राहू शकतात असं त्यांनी ई टीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितलं.

मुंबई - राज्यातील आठवीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज ( Scholarship application ) करण्याची मुदत 31 ऑक्टोबर ( filing scholarship applications ) पर्यंत आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने विद्यार्थ्यांना अडचण निर्माण झाली आहे. दिवाळीच्या सुटीमुळे शाळा नऊ नोव्हेंबरला उघडणार आहे तेव्हा शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची मुदत अन्यायकारक असल्याचं पालक, शिक्षकांचे म्हणणं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ( Maharashtra State Examination Council ) आयुक्त शैलजा दराडे ( Commissioner Shailaja Darade ) यांनी १० ऑक्टोंबर रोजीच पत्र जारी केलं आणि 10 ऑक्टोंबर रोजीच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरायचे असे त्यात म्हटले . शासनाच्या घाईघाईने काढलेल्या परिपत्रकामुळे आर्थिक दुर्बल घटकातील लाखो मुले आठवी मधील शिष्यवृत्ती पासून वंचित राहू शकतात.

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची मुदत अन्यायकारक
अर्ज करण्याची मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत - देशामध्ये आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाते महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे परीक्षा घेऊन ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त होते. महाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करणे सुरुवात केले. याची मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत दिली. मात्र दिवाळीची सुट्टी लागली आणि 9 नोव्हेंबरला शाळा उघडणार त्यामुळे 31 ऑक्टोबर मुदतीमुळे हजारो विद्यार्थी यापासून वंचित राहू शकतात; असे महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नेते सुहास हिर्लेकर यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले.

गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती - इयत्ता आठवी मधल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातल्या ज्या पालकाचे उत्पन्न वार्षिक तीन लाख 50 हजार पेक्षा कमी आहे अशा कोणत्याही विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसता येतं आणि गुणवत्तेच्या आधारे त्यांना शिष्यवृत्ती मिळते यामध्ये मुलगा मुलगी कोणी ही सहभाग घेऊ शकतो सरकारी सरकारी मान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या शाळा यामध्ये आठवीमध्ये शिकलेले कोणतेही नियमित विद्यार्थी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू होते.

या शिष्यवृत्तीसाठीची पात्रता - विद्यार्थी विद्यार्थिनींना इयत्ता सातवी मध्ये 55 टक्के गुण मिळवलेले असावे .तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी पाच टक्के सवलत देऊन 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असेल तरी त्यांना यामध्ये परीक्षेला बसता येते.

पुढील विद्यार्थी परीक्षेसाठी अपात्र असतात- विनाअनुदानित म्हणजे 100 टक्के खाजगी असलेल्या शाळेतील विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीचा लाभ घेणारे ,भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, तसेच सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी यांना या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसता येत नाही

विद्यार्थ्यांची निवड - विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षा मधून केली जाते .आणि मिळालेला गुणांच्या आधारे राष्ट्रीय मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणा नुसार विद्यार्थ्यांची निवड होते .ही परीक्षा 18 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात येईल यामध्ये बौद्धिक क्षमता याला 90 गुण असतात एकूण प्रश्न 90 असतात तर शालेय क्षमता चाचणी यामध्ये 90 गुण असतात एकूण प्रश्न नव्वद असतात आणि पात्रता आहे किमान 40% तरी गुण मिळाले पाहिजे आणि अनुसूचित जाती जमाती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32 टक्के मिळणे देखील आवश्यक आहे.

मुदतवाढ करावी - यासंदर्भात मुंबईतील पालक राजेश इवलेकर यांच्याशी ईटीवी भारत ने संवाद साधला असता त्यांनी सांगितले "आमची मुलगी कुमारी रिया इवलेकरचा उत्पन्नाचा दाखलाच काढायला वेळ लागणार. सरकारने 10 ऑक्टोबरला परिपत्रक जारी केलं पण, जनतेला समजणार कसे. दिवाळीच्या सुट्ट्या नऊ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे आमच्या मुलांचे नुकसान होऊ शकत. शासनाने त्वरित मुदतवाढ करावी अशी आमची मागणी आहे." या संदर्भात दुसरे पालक महेश जाधव त्यांची मुलगी इयत्ता आठवी शिकते कुमारी तनिष्का जाधव यांचे देखील उत्पन्नाचा दाखला राहिलेला आहे. त्यांनी सांगितले," शासनाने मुदत इतकी कमी दिली की एवढ्या कमी अवधीत उत्पन्नाचा दाखला मिळू शकत नाही त्यामुळे असे हजारो मुले जे आहेत ते यापासून वंचित राहू शकतात असं त्यांनी ई टीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितलं.

Last Updated : Oct 25, 2022, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.